ST महामंडळाचे NCMC कार्ड
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने प्रवाशांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे . डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी NCMC (National Common Mobility Card) कार्ड सुरू केले आहे.त्यामुळे आपल्याला बस ने प्रवास करताना कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे किवा सुटे पैसे जवळ ठेवण्याची गरज भासणार नाही फक्त आपणाजवळ NCMC कार्ड असणे आवश्यक आहे .
![]() |
| ST-NCMC-Card |
NCMC Card म्हणजे काय?
NCMC हे एक 'प्रीपेड स्मार्ट कार्ड' आहे. हे कार्ड वापर करून आपण एसटी प्रवासासाठीच नाही तर देशभरातील मेट्रो, बेस्ट बसेस, रेल्वे प्रवासासाठी वापरता येते. त्या कार्ड ला आपण्यास रिचार्ज करावे .
कोणाला मिळणार NCMC कार्ड?
या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे:
- विद्यार्थी: शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 'सरल' क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
- ज्येष्ठ नागरिक व महिला: अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना
- दिव्यांग प्रवासी: UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड.
NCMC कार्ड मिळवण्याची पद्धत: एसटी बस स्थानक: तुम्हाला हे काढण्यासाठी आपल्या जवळीक एसटी बस स्थानकातून काढावे लागेल कागदपत्रे
NCMC कागदपत्रे कागदपत्रे 1. NCMC कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे .
नोंदणी शुल्क: ज्या प्रवास धारकांनीजुने कार्ड काढलेले असेल त्यांना १४९/- रुपयात कार्ड मिळेल. व ज्यांना नवीन कार्ड काढायचे आहे त्यांना १९९/- रुपये इतके पैसे लागतील .
NCMC कार्ड रिचार्ज करण्याची पद्धत: 1.तुमच्या नजीकच्या एसटी बस स्थानक खिडकीवर जाऊन. 2 .ऑनलाईन बँकिंग, UPI (Google Pay, PhonePe) किंवा मोबाईल ॲपद्वारे. 3.बस कंडक्टरकडे असलेल्या ई-तिकीट मशीनद्वारे देखील तुमचे NCMC कार्ड रिचार्ज करू शकता.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !