सावधान ! सोलर साफ करताना घ्या काळजी नाहीतर होऊ शकते मोठी हानी .- Solar Hatalni - Solar Pump Handling -Solar-Panel -Cleaning

             सोलर 

               सरकारने शेतकर्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून शेतकर्यांना मागेल त्याला कृषी पंप योजना सुरु केली आहे . त्या योजनेतून शेतकऱ्यांसाठी सोलर पंप दिले जातात तसेच केंद्र सरकारने घरघुती ग्राहकासाठी "पी.एम  सूर्य घर योजनेतून घरातील छतावर सोलर बसविले जातात .

Solar Pump Handling
Solar Pump Handling

 सोलर पानेल बसविल्यानंतर कालांतराने  त्यावर धूळ, घाण ,कचरा , पालापाचोळा ,प्राण्यांची विष्टा त्यावर साचली जाते , परिणामी त्या सोलारची कार्यक्षमता  कमी होते .त्यासाठी त्या सोलारची साफ सफाई करणे खूप महत्वाचे असते.तसेच सोलर पानेल साफ करताना अनेक दुर्घटना झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो  ती साफ सफाई करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे .त्याची माहिती खालीलप्रमाणे :

 

1.

सोलर पॅनल साफसफाई करताना धोके का असतात?

1. सोलर पानेल मध्ये डक करंट असतो त्यामुळे याचा करंट जास्त असल्याने करंत लागल्यावर हात लवकर सुटत नाही .
2.सोलर पानेल सूर्यप्रकाशात सतत सक्रीय असतात त्यामुळे  ओले हात , ओले कपडे खराब वायरिंग मुळे ,  शॉक  लागण्याचा धोका असतो .


सोलर पॅनलची सफाई करताना ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका

1. ओले हात किवा ओले कपडे वापरू नये 
2.कडक उन्हात पानेल साफ करू नका .
3. स्वीच चालू ठेवून पानेल साफ करू नये .
4. डिटेर्जंट पावडर वापरू नये 
५.लोखंडी रॉड किवा धारधार साधने वापरू नये

सुरक्षिततेसाठी कोणत्या साधनाचा वापर कराल ?

1.सोलर साफ करण्यासाठी शांपूचे वापरावे .
2पानेलवर नळीने पाणी मारावे .
3. मऊ ब्रश किवा स्पंज मॉप 
4.हात वायफर
५ रबरचे हातमोजे   
     या साधनांचा वापर करावा . ज्या साधनामुळे पानेल खराब होतील किवा खर्बुडे होतील अशी साधने वापरू नये .
पानेल कसा धुवायचा किवा साफ करायचा  
  1. पानेल स्वीच बंद करणे .
2..वायरिंग तपासणे - खराब वायरिंग असेल तर ती  दुरुस्ती करून घेणे जेणेकरून विजेचा झटका लागणार नाही .
3.पानेलची स्वच्छता हि सकाळी लवकर किवा संध्याकाळी करावी .
4. पानेलची धूळ हि मउ  स्पंज ने करावी या मुळे पानेल वरील धूळ पानेल ला लटकून राहत नाही .
५. नंतर नळीने कमी दाबाने पाणी मारावे परिणामी पानेलवरील धूळ , कचरा, विष्टा धुवून काढावे 
6. शाम्पुचे पाणी घेऊन मऊ स्पंज ने पानेल  हळूवार पुसा . जास्त खरबरीत कपड्याने पानेल पुसू नये नाहीतर पानेल खराब होऊ शकतो .
७. नंतर शेवटी नळीच्या पाण्याने पानेल स्वच्छ करून घ्यावा. 
  अशा प्रकारे आपण पानेल स्वच्छ करू शकतो कोणत्याही प्रकारचा धोका टाळून 
 
   
👉 सोलर वापरणं फायद्याचं आहे, पण योग्य काळजी घेतली तर नाहीतर मोठा धोका निर्माण होवू शकतो. त्यासाठी  वरील प्रमाने पानेल साफ करावा .

Post a Comment

0 Comments