गरोदर मातांना प्रधानमंत्री मातृत्व योजनेतून मिळणार 6०००/- रुपये , असा करा अर्ज - PRADHANMANTRI-MATRUVANDANA - YOJNA

                   गरोदर मातांना प्रधानमंत्री मातृत्व योजनेतून मिळणार 6०००/- रुपये , असा करा अर्ज -  PRADHANMANTRI-MATRUVANDANA  YOJNA .

    

प्रधानमंत्री मातृत्व योजना 

    प्रधान मंत्री मातुत्व वंदना योजने अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना ५०००/- रुपयाची मदत दिली जाते.हि योजना केंद्र सरकार ची योजना असून टी महिला व बालविकास विभाग यांचा मार्फत चालवली जाते. भारताचे पंतप्रधान मा. श्री . नरेंद्र मोदी यांनी १ जानेवारी २०१७ रोजी हि योजना सुरुवात केली . महिलांना हफ्त्यांमध्ये मदत दिली जाते. जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थी असेल, तर तिला अतिरिक्त 1000 रुपये म्हणजेच एकूण 6000 रुपये दिले जातात. जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन  'PRADHANMANTRI-MATRUVANDANA  YOJNA'

 या योजनेचा लाभ घेऊ शकता. लाभार्थीला ही रक्कम थेट त्याच्या बँक खात्यात टाकली जाते.

PRADHANMANTRI-MATRUVANDANA - YOJNA
 PRADHANMANTRI-MATRUVANDANA - YOJNA


लाभ कसा मिळेल.

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला 5000 रुपये दिले जातात, जे हप्त्यानुसार तिला प्रदान केले जातात. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला 1000 रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण 6000 रुपये पात्र महिलेला दिले जातात. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत दिले जाणारे रक्कम खालीलप्रमाणे.

पहिला हप्ता : अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी 1000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

दुसरा हप्ता : गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर, 2000 रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो.
तिसरा हप्ता : 2000 चा तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो.

 

योजनेचे उदिष्टे :

 गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना मजुरी कमी मिळते .त्या नुकसानीची भरपाई मिळावी जेणेकरून बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यासा प्रोत्साहन मिळेल या हेतूने  योजनेत हा बदल करण्यात आला आहे.

 

अर्ज :

 महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाच्या http://pmmvy.wcd.gov.in  यावेबसाईट अर्ज करावा लागेल किवा आपल्या गावातील अंगणवाडी सेविका किवा आरोग्य विभाग यांचाशी संपर्क करावा लागेल '.'PRADHANMANTRI-MATRUVANDANA  YOJNA''

या योजनेसाठी लागणारी पात्रता
अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो.
गर्भपात / मृत जन्माच्या बाबतीत, लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र असेल.
राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात.
या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात.
लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे.
लाभार्थी आणि त्‍याच्‍या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असेल.

आवश्यक कागदपत्रे :
        १.  आधारकार्ड

         २. मोबाईल  नंबर

         ३. बँक पासबुक

          ४. बाळाचे लसीकरण नोंदणी कार्ड

          ५. बाळाचा जन्म दाखला

          ६. उत्पन्न दाखला


Post a Comment

0 Comments