ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील आदिवासी लोकांना मिळणार शबरी आवास घरकुल योजनेचा लाभ.- Urban Shabari Awas Yojana .
शबरी आवास योजना
अनुसूचित जमातील ज्या लोकांना राहण्यासाठी घर नाहीत किवा ज्याची घरे कुडा मातीच्या घरे,झोपडपट्या किवा तात्पुरता निवारा केलेल्या घरात राहतात अशा अनुसूचित जमातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी व्ययक्तिक लाभाची "शबरी आवास योजना " योजना राबविण्यात येत आहे . हि योजना शहरी व ग्रामीण असे दोन्ही विभागात राबविणे आवश्यक असताना हि योजना फक्त ग्रामीण भागातच मोठ्या प्रमाणात राबवली गेली त्या मानाने शहरी भागात 'शबरी आवास योजना' जास्त प्रमाणात राबविली गेली नाही .त्यासाठी आत्ता शहरी भागात देखील हि लागू करण्यासाठी शासनाने दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयात योजनेसाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात आला आहे. त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघू.
![]() |
| Urban Shabari awas Yojana |
शहरी भागासाठी शबरी आवास योजनेसाठी लाभार्थी पात्रता :
१.
लाभार्थी हा अनुसूचित जमाती चा असावा
२.
लाभार्थ्याकडे स्वतःचे पक्के घर नसावे
३.
महारास्त्रातील किमान १५ वर्ष रहिवाशीअसणे
आवश्यक
४.
घर बांधण्यासाठी स्वताची किवा शासनाने दिलेली जागा असणे आवश्यक आहे.
५.
या आधी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा .
६.
स्वतच्या नावे बँक खाते असणे आवश्यक आहे .
घरकुल बांधकाम क्षेत्र – घरकुलासाठी
शासन निर्णयानुसार बांधकामाचे क्षेत्र
२६९.०० चौ. फुट इतके असावे.
वार्षिक उत्पन्न –वार्षिक उत्पन्न ३ लाखाच्या आतील असणे आवश्यक आहे
."
अनुदान रक्कम – या घरकुलासाठी अनुदान
रक्कम २.५० लाख इतकी राहील .हि अनुदान रक्कम
४ टप्यात विभागून दिली जाईल
१. घरकुल मंजूर – ४००००/-
२. प्लिंथ लेवल -८००००/-
३. लिटल लेवल -८००००/-
४. घरकुल पूर्ण – ५००००/-
आवश्यक कागदपत्रे –
१. रहिवाशी प्रमाणपत्र
२. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र
३. घरकुल बांधण्यासाठी जागेचा पुरावा
४. तहसीलदार यांचा उत्पन्नदाखला
५. रेशन कार्ड
६. आधारकार्ड
७. चेक बुक पानाची झेरॉक्स किवा बँक
पासबुकाची झेरॉक्स
८. २ पासपोर्ट साईज फोटो
योजनेसाठी अर्ज कसा करावा .
शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी
अर्ज करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म व
आवश्यक कागदपत्रे जोडून तो फॉर्म ‘प्रकल्प कार्यालय ,एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प यांच्याकडे व्यक्तिश: किवा / टपाल / इमेलद्वारे सदर करावा .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !