सरकारचे ऑलम्पिक साठी “मिशन लक्ष्यवेध” योजना – MIssion Lakshyvedh Yojana

 

सरकारचे ऑलम्पिक साठी मिशन लक्ष्यवेध योजना  – MIssion Lakshyvedh Yojana

  मिशन लक्ष्यवेध

             राज्यातील खेळाडूंनी  आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर चांगल्या दर्जाची कामगिरी करण्यासाठी  खेळ आणि खेळाडू  पायाभूत सुविधा ,क्रीडा मार्गदर्शन , प्रशिक्षण यंत्रणा , क्रीडा स्पर्धा आयोजन , क्रीडा विज्ञान व क्रीडा वद्यैकशास्त्र,प्रोत्साहन व पुरस्कार,करिअर प्रशिक्षण ,देशी-विदेशी संस्थाच्ंया सहयोगाने क्षमता संवर्धन /विकास उपक्रम राबविणे  या  ०8 महत्वपूर्ण उधर्वगामी   (Vertical)  मुद्द्यावर भर देऊन त्यानुषंगाने (Focussed Program) खेळाडू केंद्रित 'मिशन लक्ष्यवेध' प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यासाठी “मिशन लक्ष्यवेध “ हि योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

MIssion Lakshyvedh Yojana
MIssion Lakshyvedh Yojana


शासन निर्णय

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (National Games) आणि खेलो इंडिया, (Khelo India) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडा (International Olympic  Games) स्पर्धेत खेळाडूंना केंद्रबिंदू मानून खेळाडू व स्पर्धा केंद्रीत मिशन लक्ष्यवेधआराखडा तयार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने क्रीडा विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून मिशन लक्ष्यवेध ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे, तसा शासन निर्णय सरकारने दिनांक  ११ जाने २०२४ रोजी रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे ."मिशन लक्ष्यवेध"

 

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खालील क्रीडा प्रकारचा समावेश

१.   अॅथलेटिक्स,

२.   बॅडमिंटन

३.    बॉक्सिंग,

४.    वेटलिफ्टिंग,

५.    हॉकी,

६.    कुस्ती,

७.   आर्चरी,

८.   शुटींग,

९.    रोईंग,

१०.                     सेलिंग,

११.                     लॉन टेनिस

१२.                     टेबल टेनिस

 या खेळांचा समावेश आहे

 या खेळांची हाय परफॉर्मन्स सेंटर राज्यात विविध ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे. तसेच विभागीस्तरावर 36 स्पोर्टस एक्सलन्स सेंटर व प्रत्येक जिल्ह्यात 138 क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहेत. जिल्हा विकास आराखडा तयार करुन 10 टक्के निधी क्रीडा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

मिशन लक्ष्यवेध साठी निधी :

             निवडलेल्या विविध 12 खेळ प्रकाराच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी 160 कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

3,740 खेळाडूंच्या अद्यावत क्रीडा प्रशिक्षणाची व्यवस्था

      जिल्हास्तरावर 138 क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांची स्थापना करण्यात येईल. त्याचबरोबर विभागीय मुख्यालयाचे ठिकाणी उपरोक्त निकषानुसार एकूण 36 स्पोर्टस एक्सलन्स सेंटरची स्थापना करण्यात येईल. त्याचप्रमाणे राज्य स्तरावर 12 हाय परफॉर्मन्स सेंटरची स्थापना करण्यात येईल. या माध्यमातून जिल्हास्तरावर एकूण 2760, विभागीय स्तरावर 740 आणि राज्यस्तरावर 240 अशा एकूण 3,740 खेळाडूंच्या अद्यावत क्रीडा प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे

 

Post a Comment

0 Comments