राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाची “गाव तिथे गोदाम” योजना – NEW
WAREHOUSE YOJANA .
गोदामाची गरज
शेतकरी मोठ्या कष्टाने आपला शेत माल
पिकवतो. परंतु मोठ्या प्रमाणात आवक झाली तर तो शेतमाल शेतकर्यांना
कवडीमोलभावाने विकावा लागतो . कारण
शेतकऱ्यांचा माल साठवणुकीसाठी शेतकर्यांकडे फारसे सुविधा नाहीत तसेच आवश्यक असलेले
गोदामे नाहीत परिणामी शेतकर्यांना आपला माल कमी भावाने विकावा लागतो .
शेतकऱ्यांचा माल असो किंवा त्याची शेती अवजारे हे ठेवण्यासाठी गोदामात शासनाकडून
उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने' गावात गोदाम योजना'सुरू केली
आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व
वस्त्रोद्योग विभागाने शासन निर्णय सोमवारी ( ता. १५ रोजी) काढला आहे.
NEW WAREHOUSE YOJANA :
जर
प्रत्येक गावात जर गोदामे तयार केली तर तर शेतकर्यांना आपला शेतीमाल ,
शेतीउपयोगी यंत्र सामग्री, अवजारे ह्या
वस्तू व्यवस्थित ठेवता येतील . तसेच शेत मालाला जर चांगला भाव नसेल तेव्हा शेतकरी तो माल आपल्या गोदामात ठेवेल ,व जेव्हा मालाला
चांगला भाव येईल तेव्हा तो माल विकण्यासाठी बाहेर काढेल परिणामी शेतकर्याचे नुकसान
कमी होऊन शेतकर्यांना आर्थिक फायदा होईल व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल
या हेतून महारास्त्र शासनाने “गाव तिथे गोदाम योजना” सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे .
NEW WAREHOUSE YOJANA
योजनेचा उद्देश :
ग्रामीण भागातील
लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, कृषी गोदामे
बांधण्यासाठी प्रोत्साहन देऊन कृषी गुंतवणूक वाढविणे अशा उद्देशाने राज्यातील
शेतकऱ्यांसाठी ‘ग्राम गोदाम’ योजना राबविण्यात
येत आहे.
गाव तिथे गोदाम योजना
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने
शासनास अहवाल सादर के लेला आहे.
त्याअनुषांगाने“गाव तिथे गोदाम” या प्रस्तावित योजनेचे प्रारूप तयार करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.
अभ्यास समिती
अभ्यास समितीत अध्यक्षस्थानी मार्केटिंग फेडरेशनचे सहसचिव, उपसचिव, वित्त
विभाग, उपसचिव, नियोजन
विभाग, उपसचिव, अन्न, नागरी
पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, सहसंचालक, पुणे
मार्केटिंग ब्युरो, मुंबई, महाराष्ट्र
राज्य पणन हे असतील. या समितीने आराखड्याचा मसुदा दोन महिन्यांत सरकारला देण्याचे
आहे.
काय आहे योजना?
शेतातील धान्य आणि शेती अवजारे साठवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे जे शेतकरी भाव वाढ होईल या आशेने घरीच साठवण करतात. किंवा ज्यांना हे शक्य होत नाही. त्यांना आपला माल तात्काळ विकावा लागतो. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !