गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई- Avkali Nuksan Bharpai Madat 2024

 गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई-  Avkali Nuksan Bharpai Madat 2024 

 

Avkali Nuksan Bharpai Madat 2024 

                       र्व शेतकरी बांधवाना समाधानकारक बातमी आहे कि, माहे नोव्हेंबर २०२३ नुकसान झालेल्या शेतकर्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे .माहे   नोव्हेबर  २०२३ मध्ये अवकाळी पाऊस ,गारपीट झाल्याने  नाशिक जिल्हातील मोठ्या प्रमाणात द्राक्षे , कांदा, डाळिंब , मका तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्त्यात नाशिक जिल्हात्तील जवळपास ६५ हजार शेतकऱ्यांना या अवकाळी चा फटका बसलेल्या होता. त्यात  निफाड तालुक्यातील जवळपास २३२०० इतक्या बाधित शेतकऱ्यांचा  समावेश आहे .  नाशिक जिल्हातील ६५ हजार शेतकर्यांना शासनातर्फे मदत मिळणार असून नाशिक जिल्हासाठी जवळपास ९९  कोटी ७८ लाख  इतकी   मदत मिळणार आहे 'Avkali Nuksan Bharpai Madat 2024'  त्यात निफाड तालुक्यासाठी जवळपास  ३३ कोटी ७७ लाख ८८ हजार  ९७० इतकी आर्थिक  मदत मिळणार आहेः  याविषयी संपूर्ण माहिती  बघू ..

Avkali Nuksan Bharpai Madat 2024

                            Avkali Nuksan Bharpai Madat 2024 


अवकाळीमुळे झालेले नुकसान :

           नुकसान पाहणीच्या अंतिम अहवाला नंतर 34952 बाधित हेक्टर वरील क्षेत्र नुकसान मदत साठी पात्र ठरलेली आहे. तर सुमारे 11 597 हेक्टर द्राक्षांची बाग कोट्यावधीचे नुकसान झालेला आहे. तसेच साडेदहा हजार हेक्टर वरील कांद्याचा नुकसान झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामधील 890 गावांमध्ये 67 हजार पेक्षा जास्त शेतकरी आहेत. तसेच यांना हा चांगला अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. 65 हजार 849 बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे. यामध्ये कांदा, भात, गहू, टोमॅटो, भाजीपाला व इतर पिके जसे की मका, उस इत्यादी पिकांचा नुकसान झालेला आहे. तसेच 34 हजार हेक्टरवरील डाळींब बागलाही फटका बसलेला आहे. निफाड तालुक्यामध्ये 9294 वरील तसेच बालगण तालुक्यामध्ये 570 हेक्टर नांदगाव मध्ये 3253 हेक्टर कळवण मध्ये 773 हेक्टर आणि दिंडोरी मध्ये 2964 तसेच सुरंगणा,नाशिक, त्रंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला तालुक्यामध्ये "Avkali Nuksan Bharpai Madat 2024 "सुद्धा पिकाचा नुकसान झालेला आहे.

 

अवकाळी पाऊस नुकसान भरपाई –

         नोव्हेंबर २०२३ मध्ये जे काही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या अशा शेतकऱ्यांना तब्बल 65 हजार शेतकऱ्यांना 99 कोटी 78 लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. त्या काही दिवसातच हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल मागील वर्षी पावसाने दांडी मारली त्यामध्ये खरीपात  अब्जावधी रुपयांचा नुकसान झालेला आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. परंतु आता शेतकऱ्यांची प्रतिक्रिया संपलेली आहे. आणि नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे.

   राज्य आपत्ती निधीत नुकसान भरपाईत वाढ –

     तसेच राज्य शासनाने राज्य आपत्ती निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता प्रचलित दर , व हेक्टरच्या मर्यादेत वाढ करीत जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी  वाढीव दर  १३६००/- प्रती हेक्टर ३ हेक्टरच्या मर्यादेद , बागायत पिकाच्या नुकसानि साठी मदतीचा वाढीव दर २७ हजार रु इतका वाढीव दर प्रती हेक्टर  ३ हेक्टरच्या मर्यादेद तसेच बहुवार्षिक पिकाच्या नुकसानिसाठी मदतीचा वाढीव दर ३६ हजार प्रती हेक्टर ३ हेक्टरच्या मर्यादेद अशी वाढ करीत बाधित शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे .

       ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत मिळण्याची अपेक्षा आहे. वेळेवर मदत वाटप केल्याने त्यांचे उत्पन्न स्थिर राहण्यास आणि पुढील हंगामासाठी लागवडीचा खर्च भागवण्यास मदत होईल.

 

Post a Comment

0 Comments