एक कोटीहून अधिक घरे उजळणार प्रधानमंत्री
सूर्योदय योजनेतून :Pradhanmatri Suryoday Yojana.
पंतप्रधान याची घोषणा :
२२ जाने २०२४ रोजी अयोध्या येथील राम
मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा नंतर नरेद्र
मोदी दिल्ली येथे पोहोचताच आपल्या ट्विटर अकाउंट वरून प्रधानमंत्री सूर्योदय
योजनेची घोषणा केली .
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सूर्योद्य योजनेची घोषणा करताना सांगितलं की, ''अयोध्येतून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला आहे की, आमचे सरकार 1 कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्याचे लक्ष्य घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू 'Pradhanmatri Suryoday Yojana' करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल.'' या भारत सरकारने २०१४ मध्ये अशाच प्रकारची एक योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत २०२२ पर्यंत ४० गीगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, हे लक्ष्य अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ही मुदत २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अशातच पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली ‘सूर्योदय’ योजना हे लक्ष्य पूर्ण करण्याचाच एक भाग असल्याचे दिसून येते.काय आहे सूर्योदय योजना , योजनेचे स्वरूप ,याचा काय लाभ होईल याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहेत.
![]() |
| Pradhanmatri Suryoday Yojana |
काय आहे योजना ?
या योजनेंतर्गत भारतातील १ कोटी जनतेच्या घरावर सोलर बसविण्यात येणार असून या योजनेमुळे देशातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयांचे विजेचे बिल कमी होईल. तसेच ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे भारताचे उद्दिष्टही साध्य होईल. ऊर्जा मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार डिसेंबर २०२३ पर्यंत भारताची सौरऊर्जा निर्मिती क्षमता ७३.३१ गीगावॉट इतकी आहे. त्याबरोबरच ‘रूफटॉप सौरउर्जा निर्मिती क्षमता’ म्हणजे घराच्या छतांवर लावण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रणालीद्वारे सौरऊर्जा निर्मितीची क्षमता ११.८ गीगावॉट इतकी आहे. राज्यांचा विचार केला, तर राजस्थान १८.७ गीगावॉट सौरऊर्जा निर्मितीसह पहिल्या स्थानावर, तर गुजरात १०.५ गीगावॉट सौरऊर्जेसह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच घरांच्या छतावर बसवण्यात आलेल्या सौर प्रणालीद्वारे सौरऊर्जा निर्मितीचा विचार केला, तर गुजरात २८ गीगावॉटसह पहिल्या स्थानावर, तर महाराष्ट्र १.७ गीगावॉटसह दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे देशातील सध्याच्या अक्षय ऊर्जानिर्मितीमध्ये सौरऊर्जेचा वाटा सर्वाधिक आहे."Pradhanmatri Suryoday Yojana"
सौरऊर्जा का महत्वाची
:
एक एजन्सीच्या अहवाला
नुसार भारताची लोकसंख्या जास्त प्रमाणात असून
,आगामी २५-३० वर्षत देशात उर्जेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता
आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला
एक शाश्वत ऊर्जेचा स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. भारत केवळ कोळशाद्वारे निर्मित
ऊर्जेवर अवलंबून राहू शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे भारताने मागील काही वर्षांत
कोळसा उत्पादनही दुप्पट केले असून,
२०३० पर्यंत एकून ५०० गीगावॉट ऊर्जानिर्मिती करण्याचे ध्येय
निश्चित केले आहे. त्यामुळे सौरऊर्जा निर्मिती क्षमता वाढवणे आवश्यक आहे. विशेष
म्हणजे गेल्या काही वर्षांत भारताने या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे. देशात
२०१० मध्ये केवळ १० मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती केली जात होती. मात्र, २०२३ मध्ये ही क्षमता
७० गीगावॉटपर्यंत पोहोचली आहे
आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री
सूर्योदय योजनेअंतर्गत तुमच्या घरात सौर पॅनेल बसवायचे असतील तर तुम्हाला खाली
नमूद केलेल्या काही कागदपत्रांची आवश्यकता असू शकते. यासाठी सरकारने पोर्टल जारी
केल्यानंतर संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.
- आधार कार्ड
-उत्पन्न प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- शिधापत्रिका
- वीज बिल
- मोबाईल नंबर
- बँक तपशील
- पासपोर्ट आकाराचा
फोटो

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !