उज्वला योजना २.० अंतर्गत मिळणार ७५ लाख नवीन कनेक्शन _ UJWALA YOJANA 2.0

 उज्वला योजना २.०  अंतर्गत मिळणार ७५ लाख नवीन कनेक्शन _ UJWALA YOJANA 2.0

        

UJWALA YOJANA 2.0

               जळाऊ लाकूड, कोळसा, गोवऱ्या इत्यादीं स्वयंपाकाच्या पारंपारिक इंधनाचा वापरामुळे ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही विपरीत परिणाम होत असतो.त्याला अनुसरून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (एमओपीएनजी) मे २०१६ मध्ये ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजीसारखे स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यासाठी 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना' (पीएमयूवाय) एक महत्वाकांशी योजना लागू केली.

 

UJWALA YOJANA 2.0

                                 UJWALA YOJANA 2.0


 उज्वला योजना १.

 

 भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ रोजी बलिया, उत्तर प्रदेश येथे या योजनेचा प्रारंभ केला.७ सप्टेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे  जवळपास ८ कोटी एलपीजी कनेक्शन वाटप करण्यात आले आहे .

 

उज्वला योजना २.० :

 

    स्तलांतरित कुटुंबियांना विशेष सुविधासह १.६ कोटी कनेक्शन वाटप करण्यात आले आहे. भारत सरकारने PMUY योजनेंतर्गत अतिरिक्त ७५ लाख कनेक्शन देण्यास मान्यता देण्यात"प्रधानमंत्री उज्ज्वला योजना" आली   आहे .आता पर्यंत प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत जवळपास ९८,८३७ ,७१४ इतके कनेक्शन दिले गेले आहे. त्यात उजवला योजना २.० अंतर्गत १८,९७६,२३१ इक्ते कनेक्शन देण्यात आले आहे .

उज्वला गस योजनेसाठी पात्रता :


अ ) खालील कुटुंबातील प्रोढ महिला

१.    अनुसूचित जाती /जमातीचे कुटुंबे

२.    प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण )

३.    अंतोदय अन्न योजना

४.  चहा आणि माजी-चहा मळा जमाती

५.    वनवासी

६.    बेटांवरील आणि नदी बेटांवरील रहीवासी

७.    एसईसीसी कुटुंबे (एएचएल टिआयएन)

८.    १४-कलमी घोषणेनुसार गरीब कुटुंब

ब) अर्जदाराचे किमान वय १८ वर्षे असावे.

क)एकाच घरात इतर कोणतेही एलपीजी कनेक्शन असू नये.

 

आवश्यक कागदपत्रे :

१.                                                रेशनकार्ड

२.                                                 आधारकार्ड ( लाभार्थी सह सर्व कुटुंबाचे )

३.                                                   बँक पासबुक

 मिळणारे लाभ :

पीएमयूवाय कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते. (१४.२ किलो सिलेंडरसाठी रु. १६०० / ५ किलो सिलेंडरसाठी रु. ११५०). यात खालील बाबींचा समावेश आहे:

·         सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव १४.२ किलो सिलेंडरसाठी १२५० रु. / ५ किलो सिलेंडरसाठी ८०० रु.

·         प्रेशर रेग्युलेटर १५० रु.

·         एलपीजी नळी - १०० रु.

·         घरगुती गॅस ग्राहक कार्ड २५ रु.

·         "तपासणी / मांडणी / प्रात्यक्षिक शुल्क - ७५ रु."

याव्यतिरिक्त, सर्व पीएमयूवाय लाभार्थ्यांना त्यांच्या ठेवी मुक्त कनेक्शन बरोबर तेल विपणन कंपन्यां (ओएमसी) तर्फे पहिले एलपीजी रीफिल आणि स्टोव्ह (हॉटप्लेट) दोन्ही विनामूल्य प्रदान केले जातील.

 उज्वला योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा :

           उज्वला योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी आपण ऑफलाईन  व ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे फॉर्म भरू शकतो .

१.    ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

१.केवायसी  फॉर्म -  येथे क्लिक करा

२.पूरक केवायसी दस्तऐवज आणि अभिवचन – येथे क्लिक करा .

३.स्तलांतरित करिता स्वयं घोषणापत्र _ येथे क्लिक करा.

४.संचमांडणी पूर्व तपासणी – येथे क्लिक करा .

 

२.ऑनलाईन अर्ज कसा करावा –

   ऑनलाईनअर्ज करण्यासाठी आपणास सर्व प्रथम https://www.pmuy.gov.in/ या वेबसाईट  जावून आपण फॉर्म भरू शकता किवा जवळच्या CSC  सेंटर मध्ये जावून देखील फॉर्म भरू शकता.

 

 

 

 

 

 

Post a Comment

0 Comments