अनेक शासकीय कामासाठी पुरावा म्हणून फक्त जन्मदाखलाच लागणार? जन्म दाखला
ऑनलाईन कसा काढायचा ? याची संपूर्ण माहिती
पहा .- Online Birth Certificates Download
Online Birth
Certificates
देशांत १ अक्टोबर २०२३ पासून जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे त्यानुसार आत्ता वेगवेगळ्या शासकीय कामासाठी फक्त जन्म दाखला हा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे . त्यामुळे हा जन्म मृत्यू सुधारणा कायदा काय आहे.?, त्याचा उद्देश काय आहे ?,'Online Birth Certificates" कोणकोणत्या कारणासाठी वापर करण्यात येणार आहे ?, जन्म दाखला कसा काढायचा याची संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
![]() |
Online Birth Certificates Download |
लोकसभेमध्ये जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक, २०२३ मंजूर
AIRलोकसभेमध्ये०१ आगस्त २०२३ रोजी जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक, २०२३ मंजूर करण्यात आलं. याद्वारे जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा १९६९ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नोंदणीकृत जन्म आणि मृत्यूचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी या सुधारणेद्वारे रजिस्ट्रार-जनरलची नियुक्ती केली जाणार आहे. या सुधारणेद्वारे जन्म नोंदणीमध्ये पालक किंवा माहिती देणाऱ्या व्यक्ती आपला आधार क्रमांक देखील देऊ शकतात. हा राष्ट्रीय डेटाबेस इतर डेटाबेस तयार करणार्या किंवा देखरेख करणार्या इतर प्राधिकरणांना उपलब्ध करून दिला जाऊ शकतो असं या सुधारणा कायद्यात म्हटलं आहे. या सुधारणेमुळे कोणालाही आवश्यकतेनुसार मृत्यू आणि जन्म प्रमाणपत्र सहज मिळू शकेल, तसंच या विधेयकातल्या दुरुस्तीचा उपयोग नैसर्गिक आपत्तीच्या काळात देखील होईल, असे या कायद्यात "Online Birth Certificates"सांगितले आहे.
कोणत्या कामासाठी उपयोगी :
१.
आधारकार्ड काढण्यासाठी
२.
मतदान कार्ड काढण्यासाठी
३.
शाळा /कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी
४.
ड्रायविंग लायसेन्स काढण्यासाठी
५.
विवाह नोंदणी साठी
६.
सरकारी नौकरीच्या नियुक्तीसाठी
जन्म नोंदणी प्रमाणपत्र कसे काढायचे ?
जन्म नोंदणी प्रमाणपत्र आपण स्वत घरबसल्या काढू
शकतो त्या साठी आपल्याला महाराष्ट्र शासनाचा आपले सरकार (aple sarkar ) या वेबसाईट जाऊन अप्लिकेशन करायचं आहे
त्यानंतर आपल्याला ५-१० दिवसात जन्म प्रमाणपत्र मिळेल . त्यासाठी आपल्याला
१.
सर्व प्रथम https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईट जावे
लागेल .
२.
येथे आपल्याला रजिस्ट्रेशन
करावे लागेल .नंतरuser –id password टाकून लॉगीन करावे .
३.
लागिन झाल्यानंतर ग्रामविकास व पंचायत राज हा
विभाग निवडावा लागेल त्यात जन्म दाखला हा पर्याय सिलेक्ट करावा .
४.
तेथे आपणास दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे ,
कोणता अधिकारी दाखला देतो याची माहितीदिसेल .
५.
जन्म दाखला फॉर्म ओपेन झाल्यानंतरआवश्यक
माहिती भरून ,आवश्यक फी भरल्यानंतर आपणास एक अप्लिकेशन नंबर प्राप्त होईल .
६.
दाखला लवकर मिळण्यासाठी गावातील ग्रामसेवक
यांचाशी संपर्क करून दाखला त्यांना अप्लिकेशन नंबर पाठवावा.
७.
त्यांनी एकदा आवश्यक ती तपासणी करून दाखला
अप्रू केल्या नंतर आपणास लवकरात लवकर दाखला मिळेल .
अशा प्रकारे आपण
ऑनलाइन पद्धतीने स्वत; जन्म दाखला काढू शकतो.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !