“मागेल त्याला विहीर “ योजनेसाठी मोबाइलवर शेतातूनच करा ऑनलाइन अर्ज –Magel Tyala Vihir Yojana 2023

 

  “मागेल त्याला विहीर “ योजनेसाठी मोबाइलवर शेतातूनच करा ऑनलाइन अर्ज –Magel Tyala Vihir Yojana 2023

 मागेल त्याला विहिर योजना :

       यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने  किवा दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने शेतकऱ्याचा कल विहीर खोदण्याकडे जास्त प्रमाणात असणार आहे . अशा वेळी विहीर खोदण्यासाठी जास्तीत जास्त अनुदान मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा या साठी राज्य शासनाने ग्राम पंचायतींना सूचना केल्या असून .त्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या २०२३-२४ च्या कृती आराखड्यात जास्तीत जास्त विहीर साठी प्राधान्य देण्यात यावे .५ वर्षात राज्यात किमान १० लाख विहीर खोदण्याचे काम पूर्ण करावे .असे शासनाने ठरवले आहे. त्यामुळे शासनाने "मागेल त्याला विहीर" हि योजना सुरु करण्यात आली आहे.

                             Magel Tyala Vihir Yojana

             राज्य शासनाने आता जो व्यक्ती विहिरीसाठी अर्ज करील त्याला विहीर देण्याचे ठरवले आहे  आता विहिरीसाठी अनुदानाची रक्कम ४ लाख रुपये करण्यात आली आहे .संरक्षित सिंचनाची सुविधा विहीर देते .त्यामुळे दुबार पिक करण्याची संधी शेतकर्यांना मिळते .त्त्यामुळे “प्रत्येक शेताला पाणी “हि संकल्पना राबविण्यास महराष्ट्र शासनाने सुरुवात केली आहे.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध व्हावे  असे धोरण शासनाने ठेवले आहे.त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान जास्तीत जास्त विहीर बांधकाम करण्याचे सुचवावे असे सांगण्यात"मागेल त्याला विहीर"आले आहे .

योजनेचे उदिष्ट :

१.       संरक्षित सिंचनाची सोय निर्माण करणे .

२.       गावातील मजुरांना रोजगार मिळून देणे .

अनुदान कसे मिळते.

    विहिरीसाठी अनुदान तीन टप्यात दिले जाते . त्यात पहिला टप्पा विहीर खोदण्यापूर्वी ,दुसरा टप्पा ३०-६० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर , तिसरा टप्पा विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे अनुदान दिले जाते .

मोबाइलद्वारे विहिरीसाठी अर्ज कसा करायचा :

 विहीर खोदाई अनुदानासाठी शेतकर्यांना आधी केवळ ग्रामपंचायतीकडे संपर्क करण्याचा पर्याय उपलब्ध होता परंतु आता राज्य शासनाने एक गुगल प्ले स्टोर वर एक अप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे त्या अप्लिकेशन वरून आपण विहिरीसाठी अर्ज करू शकतो . त्या साठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करावा .

MAHA-EGS Horticulture/ well app

                                Magel Tyala Vihir Yojana 



कार्य पद्धती :

१.    मोबाइल द्वारे ऑनलाईन अर्ज करावा किवा गावातील ग्रामसेवकाशी संपर्क साधून अनुदानाची मागणी नोंदवावी .

२.    शेतकऱ्यांची मागणी ग्रामसेवकाकडून पंचायत समिती तील तांत्रिक सहायकाला कळविली जाते.

३.    ग्रामपंचायतीतील ग्रामरोजगार व ग्रामसेवक याचाकडून पाठपुरावा केला जाईल.

४.    विहिरीचा कार्यारंभ आदेश मिळविण्यासाठी शेतकरी ७/१२ ,८ अ उतारा, किवा जॉब कार्ड  स्वत: अपलोड करू शकतात किवा ग्रामपंचायतीत कागदपत्रे जमा करू शकतात.

५.    विहिरीच्या नियोजित जागेची “अ “ लघु पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता किवा उपअभियंता यांच्याकडून पाहणी होते व तांत्रिक मान्यता दिली जाते.

६.    त्या नंतर गटविकास अधिकारी  अ प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देतात. त्यानंतरच कार्यारंभ आदेश  काढला जातो.

कार्यारंभ आदेश निघे पर्यंत शेतकर्याने विहीर खोदण्यासा सुरुवात करू नये .नाहीतर अनुदान नामंजूर होण्याची शक्यता असते .

 

Post a Comment

0 Comments