राज्य सरकार दुध उत्पादक शेतकऱ्यांना देणार दुधासाठी प्रती ली ५ रुपये अनुदान –Mik Subsidy 2023
Milk Subsidy
राज्य सरकारने गायीच्या दुधाला किमान प्रतिलिटर ३४ रु द्यावा असा राज्य सरकारने आदेश दिले होते परंतु काही दुध संघांनी २७- २८ रुपया पर्यत दर खाली आणले होते .यासंदर्भात भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे , राष्टवादी कांग्रेस चे आमदार जयंत पाटील यांनी या विषयी लक्षवेधी उपस्थित केली त्यावर उतर देताना मंत्री राधाकृष्ण विघे पाटील यांनी सांगितले दुध संघांनी किमान ३४ रु प्रती लिटर दुध देणे 'Milk Subsidy' बंधनकारक आहे .तसेच अनुदाना संबधी अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवार (दि.२० डिसे )यांनी विधानसभेत निवेदन दिले .
दुधाला प्रती ली ५ रु अनुदान :
निवेदनात विखे म्हणाले कि, दुध आणि दुग्धजन्य
पदाथाचे भाव हे प्रामुख्याने मागणी आणि पुरवठा , आंतरराष्टीय बाजारातील दुध भुकटी
व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात . तसेच दुधाचे उत्पादन वाढल्यास देखील
दुधाचा भाव कमी होतो अशा परिस्थितीत शेतकर्याचे हित जोपासण्यासाठी काही ठोस
उपाययोजना करणे गरजेचे आहे .त्यासाठी अतिरिक्त दुधाचे संकलन करून त्याचे दुध पावडर
, भुकटी ,बटर तयार करून दुधाचा प्रश्न मार्गी लावता येईल.तसेच दुधाला प्रती ली ५
रुपये अनुदान देण्याची घोषणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली .
दुधाला किमान २९ रुपये दार :
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कि , सध्या दुध संघा मार्फत संकलित होणार्यागायीच्या दुधाकरिता दुधउत्पादकास ५ रुपये प्रतीली अनुदान देण्यात येईल .हि योजना फक्त सहकारी दुध संस्था मार्फतच राबवली जाईल .या करिता सहकारी दुध संघांनी दुध उत्पादक शेतकर्यांना ३.२ फाट .८.३ एसएनएफ करिता प्रतिलिटर २९ रुपये दुध दर देणे बंधनकारक आहे.तसेच हि रक्कम दुध उत्पादक शेतकऱ्याचा" Milk Subsidy"थेट बँक खात्यात वर्ग करणे अनिवार्य आहे .त्यानंतर शेतकर्यांना शासनामार्फत ५ रु अनुदान शेतकऱ्याचा खात्यात वर्ग केले जाईल .तसेच हि योजना फक्त जानेवारी व फेबुवारी या दोन महिन्यासाठी लागू करण्यात येईल तसेच पुढील काळात या योजनेचा आढावा घेऊन याची कालमर्यादा वाढविण्यात येईल .
आधारकार्ड – बँक खात्याशी लिंक असणे बंधन कारक
अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या
बँक खात्यात येणार असल्याने शेतकरी बांधवानी आपले बँक खाते आधारकार्ड शी लिंक आहे
कि नाही याची खात्री करून घ्यावी नाहीतर शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे येणार नाही
.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !