जमीन खरेदी करताय का? खरेदी करताना ठेवा या गोष्ठी लक्ष्यात , नाहीतर होऊ शकतो फसवणूक .-Jamin Kharidisathi Mahatvachya Gosti.

 

जमीन खरेदी  करताय का? खरेदी करताना ठेवा या गोष्ठी लक्ष्यात , नाहीतर होऊ शकतो फसवणूक .-Jamin Kharidisathi Mahatvachya Gosti .

     

Jamin Kharidisathi Mahatvachya Gosti

      जमीन खरेदी करताना अनेक प्रकारे फसवणुकीच्या बातम्या आपण ऐकत असतो. त्यात खरेदी दिलेल्या मालक दुसऱ्या व प्रत्यक्ष कसणारा मालक दुसरा असतो. अशा वेळी फसवणूक होऊ नये या साठी काही गोष्टी महत्वाच्या असतात त्या गोष्टीची सविस्तर माहिती  खालीलप्रमाणे बघू.

Jamin Kharidisathi Mahatvachya Gosti
Jamin Kharidisathi Mahatvachya Gosti


जमीन खरेदी करताना मह्स्त्वाच्या गोष्टी :                                        

१ . 7/12 उतारा व ८अ उतारा निट  बघणे.

            जमीन खरेदी करताना सर्वप्रथम आपल्याला ज्या गावात जमीन खरेदी करायची त्या गावातील तलाठी कार्यालयात जावून  प्रथम ७/१२ व ८ अ उतारा काढून घ्यावा. किवा  जर आपल्याला ७/१२ व खाते उतारा नंबर माहित असेल तर आपण तो उतारा ऑनलाईनकाढू शकतो.

    उतारा काढल्या नंतर सर्व प्रथम आपण ज्या मालकाकडून जमीन खरेदी करणार आहे . 'Jamin Kharidisathi Mahatvachya Gosti'त्या मालकाचे नाव ७/१२ उतारावर आहे कि नाही याची तसेच त्याचे नवे क्षेत्र किती आहे हे तपासून पाहावे.तसेच त्या व्यक्तीने सदर क्षेत्रावर काही कर्ज काढलेले आहे कि नाही याची तपासणी करावी .तसेच हि जमीन न्यायालयीन खटल्यात अडलेली आहे कि नाही याची खात्री करावा. तसेच सदर जमीन काही महामार्ग, रस्ते याची नोंद आहे कि नाही याची खात्री करावी. तसेच त्या क्षेत्रावरील जमिनीचे जुने अभिलेख नोंदी काढ्यावयात त्यामुळे आपल्याला जमीन मालकात कसे बदल होत गेले याची माहिती मिळेल .

२ .भूधारणा पद्धत तपासून घेणे :

             सातबारा आपल्या हातात भेटल्यानंतर आपण डाव्या बाजूला भूधारन पद्धती असे लिहलेले असते त्या भोगवटादार वर्ग १.२ असे लिहलेले असते .

    १.       भोगवटादार वर्ग १ –ज्या जमिनीवर भोगवटादार वर्ग ०१ पद्धत असे लिहलेले असेल त्या जमिनीवर शासनाचे कोणतेही निर्बंध नसतात . यात शेतकरीच स्वत:च मालक असतो त्यामुळे शेतकऱ्याला जमीन खरेदी अथवा विक्री करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अडचण येत नाही.

    २.       भोगवटादार वर्ग ०२-  जर ७/१२ उतारावर भोगवटादार ०२ असे लिहलेले असेल तर या जमिनीवर सरकारी अधिकारी यांच्या परवानगी शिवाय या जमिनीचे हस्तातर होऊ शकत नाही .या मध्ये  देवस्थान अथवा इनामी जमिनी,भूमिहीन शेतकर्यांना वाटप केलेल्या जमिनी  "Jamin Kharidisathi Mahatvachya Gosti"यांचा समावेश होतो.

    ३.       सरकारी पट्टेदार जमिनी : या जमिनी सरकारी मालकीच्या असतात .पण भाडेतत्वावर  दिलेल्या असतात. या जमिनी १०,३०;५०;९९  वर्ष कराराने दिलेल्या असतात .

 

३.       गटाचा नकाशा बघणे :

जमिनीचा गटाचा बघितल्यावर आपल्याला त्या गटाची हद्द समजते. गट कसा आहे याची माहिती मिळते तसेच जमीन खरेदी करायच्या गटाशेजारी कोणकोणते गट आहे याची माहिती मिळेल .

४.  शेतरस्ता  -

              जी जमीन खरेदी करायची आहे आहे त्या गटासाठी थेट क्षेत्रात जाण्यासाठी रस्ता आहे कि नाही हे बघणे खूप महत्वाचे आहे.जमीन बिनशेती असेल तर जमिनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवलेला असतो.बिनशेती नसेल खाजगी असल्यास रस्तासाठी संबधित मालकाची हरकत नसल्याची खात्री करावी .

५. खरेदीखत :

सर्वात शेवटची आणि महत्वाची पाचवी गोष्ट  म्हणजे खरेदी खत . त्यासाठी तालुक्यातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून आवश्यक त्या शुल्काची पूर्तता करून खरेदी खत करून घ्यावे.यात गट नंबर, चातुसिमा , मुल मालक ,क्षेत्र बरोबर आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी .

 

शेळ्या व मेंढ्या विकत घेण्यासाठी मिळणार ५०-७५ टक्के अनुदान असा करा योजनेसाठी अर्ज – Shelya Mendhya Anudan Yojna 2023.

 

.

 

  


Post a Comment

0 Comments