पुनर्रचित  हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२३-२४ - Punarrachit Havaman Adharit falpik Vima Yojana 2023-24

       भारतात मोठ्या शेतीचे उत्पन घेतले जाते त्यात फळ पिकांचा वाटा महत्वाचा आहे .त्यामुळे फळपिकांना संरक्षण देणे खूप महत्वाचे आहे . विविध हवामान धोक्यामुळे फळ पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते . त्यामुळे शेतकर्याचे नुकसान भरपाई होण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्चीत हवामानावर आधारित विमा योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते.

Punarrachit Havaman Adharit falpik Vima Yojana 2023-24

Punarrachit Havaman Adharit falpik Vima Yojana 2023-24



Punarrachit Havaman Adharit falpik Vima Yojana 2023-24

        पुनर्चीत हवामान आधारितफळपिक विमा योजना हि शेतकऱ्याच्या अधिसूचित पिकाशी 'Punarrachit Havaman Adharit falpik Vima Yojana 2023-24'संबधित असणार्या जोखीमामुळे होण्याऱ्या नुकसानीची भरपाई करण्याचे माध्यमआहे. या माध्यमातून शेतकर्यांना अचानक उद्भवलेल्या  जोखीम जसे कि पाऊस , तापमान , वारा, आद्रता इत्यादी कारणांमुळे पिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाते .

फळपिक विमा योजना २०२३ -२४

        या योजनेत महसूल मंडळ हा घटक धरून राबविण्यात येते. प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी हवामान केंद्र बसविण्यात आलेलो आहेत. या हवामान केंद्रावर  पर्जन्यमान, तापमान , वारा वेग , आद्रता इ माहिती स्वयंचलित रित्या नोंदवली जाते. या माहितीच्या आधारे अवेळी पाऊस, कमी जास्त तापमान, वारा, वेग , गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या  फळ पिकांना संरक्षण मिळते .सदर हवामान धोके लागू झाल्यानंतर विमा धारक शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळते.

पुनर्रचित हवामान  आधारित फळपिक विमा योजनेत कोणाला लाभ घेता येतो .

   १.कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकर्यांना अधिसूचित क्षेत्रातील करण्यात आलेल्या पिकांसाठी या  योजनेचा लाभ घेता येतो.

२.कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी हि योजना ऐच्छिक आहे.

३.या व्यक्तिरिक्त कुळाने अथवा भाडेपट्टीने  शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यासाठी पात्र आहेत . कर्जदार शेतकर्यांनी        योजनेत सहभागी होण्यसाठी घोषणापत्र सबंधित 

"Punarrachit Havaman Adharit falpik Vima Yojana 2023-24"बँकेत द्यावे.

विमा संरक्षित रक्कम (प्रती हेक्टर ) :

पिक

विमा संरक्षित रक्कम (रुपये )

संत्रा, मोसंबी

८००००/-

 डाळिंब

१३००००/-

पेरू,चिकू

६००००/-

लिंबू

७००००/-

काजू

१०००००/-

आंबा ,केळी

१४००००/-

द्राक्षे

३२००००/-

पपई

३५०००/-

स्टोबेरी

२०००००/-

 

कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकर्यांनी योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख :

पिक 

शेवटची तारीख

द्राक्ष

१५ ऑक्टोबर २०२३ 

केळी

३१ ऑक्टोबर २०२३ 

मोसंबी

३१ ऑक्टोबर २०२३ 

पपई

३१ ऑक्टोबर २०२३ 

काजू

३० नोव्हेंबर  २०२३ 

संत्रा

३० नोव्हेंबर  २०२३ 

आंबा (पालघर,रत्नागीरी सिंधुदुर्ग )

३० नोव्हेंबर  २०२३ 

आंबा (नगर, धुळे,नंदुरबार ,नाशिक ,सोलापूर,व वाशीम)

३१ डिसेंबर २०२३

डाळिंब

१४ जानेवारी २०२4


 

योजनेचा लाभ कसा घ्यायचा ?

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा  योजनेंतर्गत बिगार्कार्ज्दार शेतकरी पिक विम्याचा अर्ज करण्यसाठी जवळच्या बँक शाखा/ ग्राहकसेवा केंद्र (csc) सहकारीसंस्था /कृषी विभाग /भारतीय डाक किवा क्षेत्रातील अधिसूचित विमा कंपनी किवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीशी संपर्क करावा.

लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक :

१.आधार कार्ड

२. फळ बागाची नोंदणी असलेला ७/१२ उतारा.

३.भाडे करार असलेला करारनामा

४. सहमती पत्र

५.पेरणी घोषणापत्र

६. फळबागे चा GEo Tagging केलेला फोटो

७. बँक पासबुकाची झेरॉक्स


नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीला सूचना .

          जर आपण पिकाचा विमा काढला असेल व पिकाची वरील नैसर्गिक आपत्ती मुळे पिकाचे नुकसान झाले असेल तर् ती आपल्या पिकाची  नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळविणे बंधन  कारक आहे . किवा तालुकयातील  विमा कंपनीला कार्यालयात माहिती देऊ शकता . त्यासा ठी नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या आत माहिती कळविणे आवश्यक आहे. तसेच नुकसानीची माहिती देण्यासाठी एक aap देखील बनविण्यात आलेले आहे त्यावर देखील आपण पिक नुकसानीची माहिती देऊ शकतो.


 

Post a Comment

0 Comments