लेक लाडकी योजना २०२३- Lek Ladaki Yojana 2023
मुलींचा जन्मदर वाढवणे , लिंग निवडीस प्रतिबंध करणे मुलीच्या शिक्षणास प्रोत्साहन अथवा खात्री देणे ,मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी महाराष्ट्र शासनाने “लेक लाडकी” हि योजना सुरु केली आहे .या योजनेत” माझी कन्या भाग्यश्री” या योजनेचा "Lek Ladaki Yojana 2023"देखील समावेश करण्यात आला आहे.मुलीना आर्थिक दृष्टा सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी .स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हि योजना सुरु केली आहे . यात मुलीच्या वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत जवळपास १०१००० /-रुपयाची मदत शासनाकडून देण्यात येणार आहे.
Lek Majhi Ladaki Yojana 2023
२०२३ अर्थसंकल्पीय अधिवेशनात
अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी “लेक लाडकी” या योजनेची घोषणा केली
होती त्या अनुशंघाने दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी मा मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे
यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तसा शासन निर्णय घेण्यात
आला असून त्याला मान्यता देण्यात आली आहे.या
योजनेची सविस्तर माहिती या लेखात आपण पाहू .
काय आहे लेक माझी लाडकी हि योजना ?
महाराष्ट्र शासनाने महिला
सशक्तीकारणासाठी गरीब कुटुंबियातील मुलीना लखपती करण्यासाठी “लेक माझी लाडकी” हि योजना सुरु करण्यात आली
आहे.या योजनेंतर्गत पिवळ्या आणि केशरी
शिधापत्रिका असणाऱ्या मुलीच्या
जन्मानंतर ५ हजार रुपये ,
इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये ,
सहावीत ७ हजार रुपये,
अकरावीत ८ हजार रुपये
तर मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीला ७५०००/-रुपये रोख स्वरुपात देण्यात"Lek Ladaki Yojana 2023"येणार आहे.
अशा रीतीने त्या मुलीस एकूण १ लाख १ हजार रुपये मिळणार आहे.
लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
१.मुलीचे आधारकार्ड
२.मुलीचे बँक खाते पासबुक किवा
आई-वडिल्याचे बँक खाते पासबुक,
३. उत्पन्न दाखला
४.रहिवाशी प्रमाणपत्र
५. कुटुंबाचे केशरी अथवा पिवळे
रेशनकार्ड
६.
दोन पासपोर्ट फोटो
७. संपर्क साठी मोबाईल नंबर
कोणत्या कुटुंबाना या योजनेचा लाभ होईल ?
राज्य शासनाच्या या नव्या
योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबियातील मुलीना मिळणार आहे, या
मुलीना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर ठराविक रक्कम दिली जाणार आहे.
०१ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मलेल्या
१ अथवा २ मुलीना त्याचप्रमाणे १ मुलगा १ मुलगी असल्यास , दुसर्या प्रसुतीच्या वेळी
जुळे अपत्य जन्माला आल्यास १ मुलगा अथवा दोन्ही मुली यांना या योजनेचा लाभ मिळेल
लेक लाडकी योजनेची अट :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने दोन महत्वाचा अटी ठेवण्यात आल्या
आहेत
१. ज्या मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा
आहे ती महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे .तिचा जन्म महाराष्ट्रातील असणे
आवश्यक आहे .
२. सदर योजनेसाठी मुलीच्या कुटुंबीयाकडे
पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड असणे आवश्यक आहे .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !