नमो शेतकरी महासंन्मान योजनेअंतर्गत पहिला हफ्ता लवकरचा बँक खात्यात येणार-Namo Shetkari Yojana 1st installment.

 नमो शेतकरी महासंन्मान योजनेअंतर्गत  पहिला हफ्ता लवकरचा बँक खात्यात येणार-Namo Shetkari Yojana  1st installment. 

           शेतकर्यांना निश्चित उत्पन्न मिळविण्याकरिता केद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना (PM-KISAN) सन २०१९ पासून योजना सुरु केली असून त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील त्यात भर घालण्यासाठी नमो शेतकरी महासंमान निधी ह्या योजनेची  घोषणा केली आहे .त्यानुसार केंद्र सरकार वर्षाला एकूण ६०००/- रुपये देते तसेच महाराष्ट्र शासन देखील ६०००/रुपये देणार आहे त्यानुसार वर्षाला शेतकर्यांना एकूण १२ हजार रुपये मिळणार आहे .

Namo Shetkari Yojana  1st installment
Namo Shetkari Yojana  1st installment


नमो शेतकरी महासन्मान योजना २०२३ 

         केंद्र सरकारप्रमाणेच महाराष्ट्र राज्य सरकारनेदेखील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. तशी मंत्रिमंडळात या योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेंतर्गत केंद्राप्रमाणे 4 महिन्यांत 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा"Namo Shetkari Yojana  1st installment"करण्यात येतील. पीएम सन्मान निधीचे लाभार्थी शेतकरीच राज्य योजनेसाठी पात्र असतील  असे घोषित केले होते, परंतु राज्य सरकारच्या निधीचा एकही हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.


 त्यामुळे बरेचशे शेतकरी राज्य शासनाचे योजनेचे हफ्ताची वाट  बघत होते अशा शेतकर्यासाठी आत्ता आनंदाची बातमी आली आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा निधी वितरीत   :

             राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतील पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनानेNamo Shetkari Yojana  1st installment" मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांचा बँक खात्यावर हफ्ताचे पैसे जमा होऊ शकतात .

            सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीही योजना उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केली होती.

          केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6000 या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी 6000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधीही योजना राबवण्यास जून 2023 मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पी.एम.किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधीयोजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरू आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

नमो शेतकरी महा सन्मान निधी लाभार्थी पात्रता .:

१ .प्रधान मंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत पी .एम . किसान पोर्टलवर नोंदणी केलेले , योजनेस  पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान निधी ह्या योजनेस पात्र असतील .

२.तसेच पी एम.किसान पोर्टल वर नव्याने नोदणी होवून लाभ मिळालेले लाभार्थी देखील या योजनेस  पात्र असतील .

  • लाभ घेणारा शेतकरी हा अल्पभूधारक असावा. (२ हेक्टर किंवा ५ एकर पेक्षा कमी क्षेत्र नावावर असावे.)
  • लाभार्थी शेतकरीकुटुंबातील  पती-पत्नी दोघांपैकी एकच व्यक्ती  या योजनेचा लाभ घेऊ शकता 
  • लाभ घेणारा शेतकरी हा आमदार,खासदार,जि.प.सदस्य किंवा पं.स.सदस्य नसावा.
  • लाभार्थी शेतकरी हा सरकारी नोकरदार नसावा.
  • लाभार्थी शेतकरी Income Tax भरणारा नसावा.
  • शेतकऱ्याच्या नावावर स्वतंत्र ७/१२ ,८ अ उतारा असावा.
  • शेतकऱ्याच्या नावावर जमीन हि २०१९ च्या आधी झालेली असावी.

 

नवीन नोंदणी करण्यासाठी आवश्यक  कागदपत्रे :

  • आधार कार्ड    
  • ७/१२
  • ८ अ
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर
  • बँक खात्यास आधार कार्ड लिंक असावे.  

नमो शेतकरी महासन्मान योजना शासन निर्णय: येथे क्लिक करा 

नमो शेतकरी महासन्मान योजना माहिती : येथे  क्लिक करा 

Post a Comment

0 Comments