मोदी आवास योजने २०२३ अंतर्गत मिळणार घरकुलासाठी अनुदान योजनेची संपूर्ण माहिती - Modi Awas Yojana २०२३

  मोदी आवास योजने २०२३ अंतर्गत मिळणार घरकुलासाठी अनुदान योजनेची संपूर्ण माहिती - Modi Awas Yojana  २०२३ 

           “सर्वांसाठी  घरे -२०२४ “  हे राज्य शासनाचे धोरण  असून  त्या नुसार राज्यातील जे लोक बेघर आहेत ,तसेच  ज्याचे घर कच्च्चे बांधकामाचे आहे अशा पात्र धारक लाभार्थ्यासाठी २०२४ पर्यंत सर्वाना घरकुल  मिळावे यासाठी ग्रामीण भागातील लोकांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत  “ मोदी  आवास योजना “ सुरु करण्यात आली आहे .सदर योजनेत घरकुल बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे  .त्याचप्रमाणे ज्यांचे कडे जागा उपलब्ध नसल्या त्यांना जागेसाठी देखील अनुदान मिळणार आहे ..

    घरकुल योजनेसाठी काय पात्रता , किती अनुदान ,फॉर्म कुठे भरायचा , कागदपत्रे ,घरासाठी जागा उपलब्ध नसल्यास जागा घेण्यासाठी किती अनुदान मिळेल .मोदी आवास योजनेची संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत 

Modi Awas Yojana  २०२३

               Modi Awas Yojana  २०२३




Modi Awas Yojana

                  २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय  भाषणात तत्कालीन अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर"Modi Awas Yojana  २०२३" करताना  इतर मागासवर्गीय लाभार्थ्यासाठी  येत्या ३ वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी “मोदी आवास योजना ‘ सुरु करण्यात येईल अशी घोषणा करण्यातआली होती त्या अनुशंघाने ३ वर्षात १२०० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे सन २०२३-२४  या वर्षात ३ लाख घरे बांधण्यासाठी ६०० कोटी रुपये  द्नेयात येथील याची घोषणा केली होती. इतर मागास प्रवगातील लाभार्थ्यासाठी येत्या तीन वषात 10 लाख घरे बाधांण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबववण्याबाबतच्या प्रस्तावास दि 21.07.2023 रोजी मा. मंत्री मंडळाने  मान्यता दिली  आहे. त्यानुसार शासननिर्णय इतर मागास बहुजन कल्याणविभाग  क्र.वगृयो-2023/प्र.क्र.33/योजना-5, दि..28.07.2023प्रसिद्ध  करण्यात आला आहे.

विविध घरकुल योजना :

आवास प्लस मध्ये अंतर्भूत  होऊ न शकलेल्या अनुसूचित जाती व जमाती प्रवगातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी राज्य शासनाने काही योजना सुरु केल्या आहेत.

Ø                 रमाई  घरकुल योजना

Ø              शबरी आवास योजना

Ø              आदिम आवास योजना

Ø              विमुक्त  जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना .

Ø                धनगर आवास  योजना

 

इतर घरकुल योजना

           इतर मागास प्रवर्ग तील लोकांसाठी अशा कोणत्याही प्रकरचा   योजणा अस्तित्वात नाही त्यामुळे इतर मागास प्रवर्ग लोक घरकुल योजने पासून वंचित राहू नये म्हणून मोदी  आवास योजना सुरु करण्यात आली आहे .

आवास प्लस प्रणाली :

राज्यात ग्रामीण भागात  वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवगातील खालील पात्र कुटुांबानांा घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी "मोदी आवासघरकुल योजना राबववण्यास शासन"Modi Awas Yojana  २०२३ "मान्यता देत आहे.

1. आवास प्लस मधील प्रतीक्षा  यादीत नाव असलेले लाभार्थी .

2. आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परांतु automatic system द्वारे reject झालेले पात्र लाभार्थी .

 3. जिल्हा निवड समितीने निवड केलेले लाभार्थी 

 

मोदी आवास योजना  स्वरूप :

           इतर मागास प्रवर्गातील  पात्र लाभार्थाना नवीन घर बांधण्यासाठी  अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्का घराचे रुपातर करण्यासाठी १ लाख २० हजार रुपये तके अनुदान मिळेल .या योजने अंतर्गत पात्र लाभार्थाना किमान २६९ चौ. फुट इतकी घराचे बांधकाम करणे आवश्यक राहील .

·        योजने अंतर्गत निवड झालेले १ ,२ .३ मधून कुटुंब यादीतून निवड करण्यात येईल.

·        प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेद्वारे  निवड करण्यात येईल

·        लाभार्थ्याची स्थळ पाहणी करण्यात येईल.

·        ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या लाभार्थ्याची तालुका स्तरावरील गट विकास अधिकारी यांच्यामार्फत छाननी करण्यात येईल

·        जिल्हा निवड समिती मार्फत लाभार्थ्याची निवड करण्यात येईल.

 

लाभार्थी पात्रता :

१.             लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी आणि इतर मागास प्रवर्गातील असावा

२.             किमान महाराष्ट्रात १५ वर्ष वास्तव असणे आवश्यक

३.             वार्षिक उत्पन्न १.२० लाखाच्या आतील असावे,

४.             स्वतःचे अथवा कुटुंबाचे स्वतःच्या मालकीचे पक्के घर नसावे .

५.             लाभार्त्याकडे स्वताची अथवा शासनाची जमीन असणे आवश्यक .

६.             एकदा लाभ घेतल्यानंतर पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही .

 

योजनेसाठी आवश्यक कागदपत्र :

१.             ७/१२ उतारा / मालमत्ता पत्रक /ग्रा.प मालमता नोंद वहीचा उतारा .

२.             जात प्रमाणपत्र आवश्यक

३.             आधारकार्ड

४.             रेशनकार्ड/ निवडणूक ओळखपत्र

५.             जॉब कार्ड

६.             बँक पासबुक झेरॉक्स

घरकुल अनुदान माहिती :

               घराच्या बांधकामाच्या  प्रगतीनुसार राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण  कायालयाकडून ठरवून दिलेले बाधांकाम पूर्ण  झाल्याची खात्री झाल्यानंतर  सार्वजनिक  वित्त  व्यवस्थापन  प्रणालीद्वारे (PFMS) निधी  लाभार्थ्यांच्चया बँक खात्यावरवर्ग  करण्यात येईल.          घरकुल योजनेंअंतर्गत  राज्य शासनाने घोषित  केलेल्या डोंगराळ /दुगणम भाग क्षेत्रामध्ये  घरकुल बाधांकामाकरीता प्रती  घरकुल रु. 1.30 लक्ष व सर्वसाधारण क्षेत्रात  घरकुल रु. 1.20 लक्ष अर्थसहाय्य  देय राहील.

             प्रधानमंत्री आवास योजने प्रमाणे –ग्रामीण योजने प्रमाणे  ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत देय असलेले अनुदान ९०/९५ दिवस अकुशल मजुरीच्या स्वरुपात अभिसरणा द्वारे देय राहील.

    तसेच शैचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देय असलेले १२०००/- या योजनेच्या अनुदानास पात्र राहतील .

मोदी आवास योजना जागा खरेदीसाठी अनुदान :

               इतर मागास प्रवगातील ज्या पात्र लाभार्थ्यांकडे घरकुल बाधांकामाकरीता स्वत:ची जागा उपलब्ध नाही, अश्या लाभार्थी  योजनेच्या  लाभापासून वंचित राहू नये, याकरीता सदर लाभार्थ्यांना क्रातां क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले  घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनें अंतर्गत  500 चौ.फुट  जागेपयंत रु. 50,000/- पयंत अनुदान देय राहील.                                                                इतर मागास प्रवर्गा व्यक्तिरिक्त   अन्य प्रवगातील पात्र लाभार्थी पंडित  दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य  योजनेंतर्गत प्रचलित असलेल्या तरतुदीनुसार लाभ मिळवण्यास  पात्र असेल.

 

 

 

 

 

 

 

 

Post a Comment

0 Comments