आता मिळणार शेतकर्यांना वर्षाला १२ हजार रुपये - Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna.

 आता मिळणार शेतकर्यांना वर्षाला १२ हजार रुपये  - Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna.

        शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळविण्याकरिता केद्र शासनाने "प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना"(PM-KISAN) सन २०१९ पासून योजना सुरु केली असून त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील त्यात भर घालण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी ह्या योजनेची  घोषणा केली आहे .त्यानुसार केंद्र सरकार वर्षाला एकूण ६०००/- रुपये देते तसेच महाराष्ट्र शासन देखील ६०००/रुपये देणार आहे त्यानुसार वर्षाला शेतकर्यांना एकूण १२ हजार रुपये मिळणार आहे .

Namo Shetkari Mahasanman Yojna.

               मा.वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषना मध्ये राज्यातील बळीराजाचे उत्पन्न वाढविण्यासाठी  "प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत" राज्य शासनाच्या अनुदानात भर घालणारी 'नमो शेतकरी महासन्मान निधी 'हि योजना राबवण्या बाबत घोषणा केली आहे .केंद्र शासनाच्या प्रधान मंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासंमान निधी हि योजना राज्यात राबव्ण्याबाबतचा प्रस्तावास दि.३०/०५/२०२३रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्या आली असून तसा' Namo Shetkari Mahasanman Yojna'.शासन निर्णय दि.१५ जून २०२३ रोजी काढण्यात आला आहे .

  तसेच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहे ,योजनेची कार्य पद्धती ,अंमल बजावणी तसेच योजनेची संपूर्ण माहिती आपण ह्या लेखात बघू .

Namo Shetkari Mahasanman Yojna
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna



नमो शेतकरी महा सन्मान निधी लाभार्थी पात्रता .:

१ .प्रधान मंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत पी .एम . किसान पोर्टलवर नोंदणी केलेले , योजनेस  पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान निधी ह्या योजनेस पात्र असतील .

२.तसेच पी एम.किसान पोर्टल वर नव्याने नोदणी होवून लाभ मिळालेले लाभार्थी देखील या योजनेस  पात्र "Namo Shetkari Mahasanman Yojna".असतील .

नमो शेतकरी महा सन्मान निधी कार्य पद्धती . :

पी .एम .किसान योजनेच्या पी एफ एम एस (PFMS)प्रणाली नुसार प्रत्येक हप्ता वितरण वेळी पात्र ठरल्रले लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान निधी या लाभासाठी पात्र असतील .तसेच पैसे हे शेतकऱ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात जमा केले जातील .

नमो शेतकरी महा सन्मान निधी वितरणाची  कार्य पद्धती .

केंद्र शासनाच्या पी .एम.किसान योजनेच्या खालील वेळा पत्रका  नुसारच लाभार्थ्याच्या  थेट बँक खात्त्यावर कृषी आयुक्त यांच्या मार्फत पैसे  वितरीत करण्यात येतील  .

अ क्र

हप्ता क्रमांक

कालावधी

रक्कम

पहिला हप्ता

एप्रिल ते जुलाई

२०००/

दुसरा हप्ता

ऑगस्ट ते नोव्हेंबर

२०००/-

तिसरा हप्ता

डिसेंबर ते मार्च

२०००/-

 

 

अशा प्रकारे आपण नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चा लाभ घेऊ शकता .

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा शासन निर्णय (GR)खालील प्रमाणे -
                            येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments