कांदा चाळ अनुदान योजना २०२३ - Kanda Chal Anudan Yojana 2023
नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण महाडीबीटी योजने अंतर्गत कांदा चाळ योजना या विषयी माहिती घेणार आहे . त्यात कांदाचाळ अनुदान घेण्यासाठी कोणते शेतकरी अर्ज करू शकतात . त्याच्या अटी व शर्ती काय , अर्ज कसा ,कुठे कारायचा , अनुदान किती व कसे भेटेल याची संपूर्ण माहिती बघू,
Kanda Chal Anudan Yojana 2023
भारत हा कृषी प्रधान देश असून त्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते . महाराष्ट्रात मोठया प्रमाणत कांदा पिकाची लागवड केली जाते त्यात .कांदा पिक वर्षातून 'Kanda Chal Anudan Yojana 2023'दोन हंगामात त्यात खरीप व रब्बी घेतले जाते .खरीप हंगामातील कांदा हा कमी दिवस टिकणारा कांदा असतो तर रब्बी हंगामातील कांदा हा टिकणारा कांदा असतो त्यामुळे कांदा पिकाची साठवण व्यवस्थित करणे आवश्यक असते त्यामुळे साठवणुकीसाठी कांदा चाळ आवश्यक आहे.
![]() |
Kanda Chal Anudan Yojana 2023 |
Kanda Chal Anudan Yojana 2023
शेतकरी कांदा सर्व साधारण
पणे जमिनीवर पसरून ठेवून किवा स्थानिक
रित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदा साठवून ठेवतात . त्यामुळे कांदा सडून मोठ्या
प्रमाणात कांदाचे नुकसान होते . तसेच कंदाची प्रत व टिकावूपणा
यावर विपरीत परिणाम होऊन शेतकर्याचे उत्पन्नात घट निर्माण होते .त्यामुळे शास्र शुद्ध पद्धतीने कांदा उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत राखली जाऊन शेतकर्यांना
अधिक उत्पन्न मिळत असल्याने कांदा चाळ उभारणीकडे शेतकऱ्याचा कल वाढत आहे. तसेच कांदा चाळीत कांदा साठवल्याने ज्यावेळी कांद्याचे भाव वाढतील त्या वेळी आपण
कांदा विक्री साठी अनु शकतो .परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल .
कांदा अनुदानाचे स्वरूप :
५,१०,१५,२०,व २५ मे. टन क्षमतेच्या कांदाचाळी उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० % किवा कमाल रु ३५०० प्रती मे.टन या
प्रमाणे क्षमतेनुसार अनुदान देय राहील.
कांदा चाळ योजनेचा उद्धेश :
१. कांदा पिकाचे साठवणुकीत नुकसान कमी
करणे .
२. कांदा पिकाची हंगामामध्ये आवक वाढून कांद्याचे भाव कोसळणे तसेच हंगामा व्यतिरिक्त कांद्याचा तुडवडा निर्माण होऊन"Kanda Chal Anudan Yojana 2023"भाव वाढणे अशा समस्येवर नियंत्रण मिळवणे .
लाभार्थी निवडीचे निकष :
१. सदर योजनेसाठी अर्ज करणाऱ्या
शेतकर्याकडे स्वत;च्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
२. तसेच ७/१२ उतार्यावर कांदा या पिकाची
नोंद असणे आवश्यक आहे .
३. सामाईक खातेदार असल्यास इतर खातेदाराची
सहमती पत्र असणे आवश्यक आहे.
४. सदर योजनेचा लाभ व्ययक्तिक कांदा
उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट , स्वयं सहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकर्याचे
उत्पादक संघ,( Farmers Producer Organazations FPO’s), नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था ,
शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था ,सहकारी पणन
संघ यांना लाभ घेता येईल.
कांदा चाळ योजनेचे कार्यपद्धती :
१. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम
शेतकरी यांनी mahadbt पोर्टल (https://mahadbt.maharashtra.gov.in)वर कांदाचाळ योजनेसाठी अर्ज करावा .
२. अर्ज केल्यानंतर आपल्याला लॉटरी
पद्धतीने आपला नंबर लागल्यानंतर आपण संपूर्ण आवश्यक कागदपत्रे उपलोड करावी . त्यात
७/१२ उतारा, खाते उतारा , आधारकार्ड छायांकित प्रत , आधार सलंग्न बँक खात्याचे
प्रथम [पानाची छायांकित प्रत ,संवर्ग प्रवर्गातील असल्यास अनु.जाती /जमातिचे
शेतकऱ्यांसाठी ) विहित नमुन्यातील हमीपत्र , कांदा चाळीचे इस्तीमेट, नकाशा
.इत्यादी
३. त्यानंतर आपल्याला पूर्व समती मिळेल .तेव्हाच आपले कांदाचाळ चालू करावे. पूर्वसमती
पत्राबरोबर दिलेल्या आराखड्याप्रमाणे (डिझाईन )व तांत्रिक निकषां नुसार उभारणी
करणे बंधनकारक असेल .
कांदा चाळ अनुदान प्रस्तावामध्ये सादर करावयची कागदपत्रे :
१. ७/१२ उतारा
२. स्थळप्रत नकाशा
३. चतुर्सिमा
४. आधारकार्ड ची छायांकित प्रत
५. आधार सलंग्न बँक खात्याच्या पासबुकाची
प्रथम पानाची छायांकित प्रत
६. संवर्ग प्रमाणपत्र (अनु.जाती/जमातीतील
शेतकऱ्यांसाठी )
७. हमीपत्र
८. पूर्व सहमती पत्र
९. बंधपत्र
१०.सेवा पुरवठादारा कडील बिले इ.
अशा प्रकारे आपण कांदा चाळ अनुदान
योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्या साठी आवश्यक
बाबी ची या लेखात माहिती घेतली . या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !