महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गतमिळणार नवीन विहिरीसाठी 4 लाख रु अनुदानअसा करा मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज , योजनेची संपूर्ण माहिती - Mnrega Vihir yojana 2023

महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गतमिळणार नवीन विहिरीसाठी 4 लाख रु अनुदानअसा करा मोबाईलद्वारे ऑनलाईन   अर्ज  , योजनेची संपूर्ण माहिती - Mnrega Vihir Yojana 2023  

        नमस्कार मित्रानो आज च्या लेखात आपणा महात्मा गांधी रोजगार हमी योजना(mnreega) अंतर्गत मागेल त्याला विहीर योजना  या नुसार नवीन विहीर बांधण्यात येणार आहे तसेच दोन विहिरी तील अंतर यातील अट  सुद्धा रद्द करण्यात आली असून त्यात शिथिलता आणण्यात आली आहे .तसेच  विहिरीसाठी अनुदानाची रक्कम ३ लाखावरून ४ लाख रूपये करण्यात आली आहे.  त्या नुसार'mnrega Vihir yojana 2023'   त्याच्या आवश्यक पात्रता , कागदपत्रे , अनुदान कसे मिळणार , जोब कार्ड कसे काढायचे ,  फॉर्म कसा भरायचा  ,योजनेची संपूर्ण माहिती  या लेखात आपण पाहणार .

Mnrega Vihir Yojana 2023

                                                 Mnrega Vihir Yojana 2023



शासन निर्णय : 

                      महार्त्मा गाधी रोजगार हमीतून  रस्ते करण्यासाठी, घरकुल बांधण्यासाठी  मजुरांना अनुदान, वृक्ष लागवड  व संवर्धन करण्यसाठी , विहीर पुनर्भरण करण्यासाठी ,फळबाग लागवडीसाठी अनुदान अशाच प्रकारे मजुरासाठी निधी दिला जातो.त्याच प्रमाणे आत्ता  मागेल त्याला विहीर  या योजनेतून विहिरीसाठी अनुदान देण्याचा  निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्या बाबतचा शासन निर्णय  दिनांक ०४ नोव्हेबर २०२३ रोजी प्रकाशित करण्यात  आला आहे. या विषयी सविस्तर माहिती बघू .




रोजगार हमी योजना :

            राज्यातील प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्याचा निर्णय शासनाने घेतला  आहे. भूजल सर्वेक्षण नुसार राज्यात भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे प्रमाणेराज्यात अजून 3,87,500 विहीरी खोदणे शक्य आहे. जर विहिरी खोदल्या गेल्यास पर्यायाने पाण्याचा उपलब्ध साठा वाढणार आहे पर्यायाने तुषार सिंचन / ठिबक   क्षेत्र वाढवून फळबाग लागवड क्षेत्र वाढेल पर्यायाने  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून"mnrega Vihir yojana 2023"   कुटुंब लखपती होतील .व महाराष्ट्रातील दारिद्र रेषेखालील कुटुंबाना उत्पन्न वाढविणे शक्य होईल .

mnrega Vihir yojana 2023  

              या योजने त काळानुसार बदल करण्यात आले आहे त्या नुसार   आले असून त्यात वैयक्तिक लाभावर विशेष भर देण्यात आला आहे. त्या वैयक्तिक कामावर किमान ६० टक्के खर्च करण्याचे निर्देश भारत सरकारने दिले आहे . मनरेगा  हि रोजगारी देणारी योजना नसून विकासात भर घालणारी योजना आहे.

विहीर  लाभ धारकाची निवड

लाभ धारकाची निवड  करताना खालील  प्राधान्यक्रमानुसार निवड करण्यात येईल .

१.    अनुसूचित जाती

२.    अनुसूचित  जमाती

३.    भटक्या जमाती

४.    निरधीसुचीत जमाती ( विमुक्त जाती )

५.    दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

६.    स्त्री कर्ता असलेली कुटुंबे

७.    शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे

८.    जमीन सुधारण्याचे लाभार्थी

९.    इंदिरा  आवास योजने खालील लाभार्थी

 

लाभ धारकाची  पात्रता :

१.    लाभ धारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक

२.     अस्तित्वात असलेल्या पेयजल स्रोताच्या ५०० मीटर  परिसरात सिंचन विहीरअनुनेय करू नये .

३.    दोन सिंचन विहिरीमधील १५० मीटरची अट लागू राहणार नाही .

४.   लाभार्थ्याच्या  ७/१२ वर आधीच विहिरीची नोंद नको.

५.    ८ अ एकूण क्षेत्राचा दाखला असणे आवश्यक

६.    ज्यांना विहिरीचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्या जवळ जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

 विहिर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

१.     ७/१२ उतारा

२.     ८अ उतारा

३.     जाब कार्ड

४.     सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर क्षेत्र पेक्षा अधिक  सलग जमीन असल्याचा पंचनामा

५.     सामुदायिक विहीर असल्यास सामोप्चारानी पानी वापराबाबत सर्व लाभार्थ्या मध्ये करार पत्र.

 

महात्मा गांधी रोजगार्र हमी योजनेतून नवीन विहिरीसाठी अर्ज कार्यपद्धती

१.नवीन विहीर साठी अर्ज भरण्याचे काम ग्रामपंचायतिचे असेल .हे कार्य ग्राम रोजगार सेवकामार्फत  केले जाईल .२.सदर प्राप्त झालेले अर्ज याची ग्रामसभे मार्फत निवड करण्यात येईल .  त्यासाठी गरजेनुसार विशेष ग्रामसभा घेण्यात येतील.प्राप्त झालेल्या अर्जावर ग्रामपंचायतीला लेबार बजेट तयार करावे लागेल.                 

३.  नंतर  ग्रामसभेने मान्यता दिलेले लाभार्थी यांना सदर कामास गट विकास अधिकारी यांचा मार्फत एक महिन्याचा आत तांत्रिक किवा प्रशासकीय मान्यता देण्यात येईल .

४. तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर  मनरेगा  कायदाच्या तरतुदीनुसार  जिल्हा  परिषदेने शेल्फवर  कामे मंजूर करतील .




महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गतमिळणार नवीन विहिरीसाठी 4 लाख रु अनुदानअसा करा मोबाईलद्वारे ऑनलाईन   अर्ज  , योजनेची संपूर्ण माहिती - mnrega Vihir yojana 2023  

 

 

 

 


Post a Comment

0 Comments