मल्चिंग पेपर अनुदान योजना – Malching Pepar Anudan Yojana

                   

मल्चिंग पेपर अनुदान योजना – Malching  Pepar Anudan Yojana

नमस्कार शेतकरी मित्रानो , शेतकर्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवीत असतात .त्यात “एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान “अंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी अनुदान देत असतात त्यात शेतकऱ्यांनाप्लास्टिक मल्चिंग पेपर साठी देखील अनुदान देत असतात.

   

Malching  Pepar Anudan Yojana

आजच्या लेखात आपण एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर साठी किती टक्के  अनुदान मिळते , किती मायक्रोन साठी ,अर्ज कसा  करायचा ,मल्चिंग पेपरचे फायदे , या सर्व विषयी माहिती आपण या लेखात घेऊ ,त्यानुसार मल्चिंग पेपर ची माहिती खालील प्रमाणे.

Malching  Pepar Anudan Yojana
Malching  Pepar Anudan Yojana



मल्चिंग पेपर ची आवश्यकता 

 शेतकरी शेतीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. त्यात बहुतांशी शेतकरी हि गरीब असल्याने ते मल्चिंग पेपर चा वापर करू शकत नाही . 'Malching  Pepar Anudan Yojana'    तसेच राज्यात बहुतांशी भागात दुष्काळ असतो  त्यामुळे  जेथे कमी पाणी असते तेथे जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंग करणे आवश्यक असते जर पिकाचे नुकसान झाले तर परिणामी शेतकर्यांची उत्पन्न कमी होऊन आर्थिक कमतरता निर्माण होते.

शेतकर्यांना पिकाची लागवड केल्यानंतर कीट- रोग यांचा सामना करावा लागतो . तसेच अति जास्त पाऊस ,कमी प्रमाणात पाऊस या सारखा नैसर्गिक आपत्ती . तसेच मल्चिंग नसल्यामुळे तणांचे मोठ्या प्रमाणात वाढ होते . परिणामी “तन खाई धन “ या उक्ती प्रमाणे पिकाचे"Malching  Pepar Anudan Yojana" संपूर्ण पोषक हे तन खून घेतात परिणामी उत्पन्न कमी होते  त्यामुळे शेतकर्याची आर्थिक  परिस्थिती ढासळते  त्यामुळे शेतकरी आत्महत्या सारख्या गोष्टींकडे वळतात.

मल्चिंग  पेपरचे फायदे:

१.    जमीनीतील  ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंग पेपर चा खूप महत्वाचा फायदा होतो.

२.     तणाचे नियंत्रण करणे सोपे होते.

३.    पाण्याचेबाष्पी भवन कमी होते .

मल्चिंग पेपर साठी अनुदान :

सर्वसाधारणपणे मल्चिंग पेपर साठी ५० टक्के अनुदान दिले जाते. प्रती हेक्टर  खर्च हा ३२०००/- इतका येतो त्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेतून ५० टक्के इतके अनुदान  मिळते .म्हणजे हेक्टर  जवळपास १६०००/- इतके अनुदान मिळते .

डोंगराळ भागासाठी  हेक्टरी ३८०००/- इतके अनुदान मिळते .डोंगराळ भागात १८४००/- इतके ५० टक्के इतके अनुदान मिळते .

 

मल्चिंग पेपरची पिकानुसार प्रकार :                                                       

१.    3-4 महिने कालावधीचे पिके – २५ मायक्रोन –                         

२.    ११-१२ महिने कालावधीचे पिके -५० मायक्रोन

३.    जास्त कालावधीचे पिके – १००/२०० मायक्रोन

 

मल्चिंग पेपरचा लाभ कोण घेऊ शकतो .

१.    ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेती असेल किवा ज्याचे नावे ७/१२ उतारा आहे असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतील.

२.    सदर योजने अंतर्गत व्ययक्तिक शेतकरी, शेतकरी समूह , शेतकऱ्यांच्या उत्पादन कंपन्या ( fpo), बचत गट ,सहकारी संस्था .इत्यादींना अर्थसहाय्य देय राहील .

आवश्यक कागदपत्रे :

१.    ७/१२ उतारा आणि ८अ खाते उतारा

२.    आधार कार्ड

३.    आधार सलग्न बँक पासबुक खाते

४.    ७/१२ उतारावर पिकाची नोंद असणे  आवश्यक .

५.    मल्चिंग पेपर खरेदी केलेले बिले .

 

अर्ज कसा करावा .

१.    अर्ज करण्यासाठीं प्रथम आपल्याला mahadbt या पोर्टल वर यावे लागेल.

२.    त्यानंतर तेथे user आयडी व पासवर्ड तयार करून लॉगीन करावे.

३.    लॉगीन झाल्यानंतर “एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान “या मेनुवरील बाबी निवडा यावर क्लिक करावे .

४.      नंतर त्यातील प्लास्टिक मल्चिंग या ऑप्शन वर क्लिक करावे.

५.    मल्चिंग पेपर ची जाडी सिलेक्ट करावे.

६.    नंतर अर्जाचा प्राधान्यक्रम निवडून अर्जाचे चलन भरावे .

अशा प्रकारे mahadbt या पोर्टल वर अजर करता येईल. अर्ज तुम्ही स्वत भरू शकता  किवा जवळच्या “आपले सरकार सेवा केंद्र” येथे जाऊन अर्ज भरून घेऊ शकता. योजनेची अधिक माहितीसाठी आपण  आपल्या गावातील कृषी सहाय्यक किवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकतात .

 

 

 

 













Post a Comment

0 Comments