डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना dr. babasaheb ambedkar krushi swavlamban yojana
अनुसूचित जाती/ नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ करून
त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी १९८२-८३ पासून राबविण्यात येत असलेली अनुसूचित जाती
उपयोजना ( विशेष घटक योजना ) नाव बदलून डॉ
बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
या नावाने ५ जानेवारी २०१७ बदलण्यात आले.
महाराष्ट्रातील काही भागात खूप पाऊस ,तर काही भागात खुप दुष्काळ आहे. त्यामुळे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही . परिणामी कोरडवाहू शेतेचे प्रमाण जास्त आहे. अनुसुचित जाती शेतकर्याचे उत्पन्न कमी असल्या कारणाने शेती मध्ये जास्त खर्च करू शकत नाही. परिणामी त्यांचे उत्पन्न कमी होते . त्यामुळे ते आपला विकास करू शकत नाही . त्यासाठी त्यांना नवीन बाबीवर अनुदान देऊन त्याचे उत्पन्न वाढविण्यावर
'krushi swavlamban yojana'भर देण्यासाठी सदर योजना तयार करण्यात आल्या आहे
.
जमिनीतील ओलावा
टिकवून ठेवण्याच्या दृष्टी कोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देवून त्याचे आर्थिक
उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर
कृषी स्वावलंबन योजना हि राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे .
शासनाने आतापर्यंत अनुसूचित जाती च्या समाजातील शेतकऱ्सायांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबविल्या जात आहे . परंतु हि
योजना अनुसूचित जातीच्या शेतकर्यांसाठी
खूप उपयुक्त ठरली आहे. त्यात शासनाने वेगवेगळ्या वेगवेगळ्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे त्या बाबीची माहिती खालील
प्रमाणे .
सदर योजनेतखालीलप्रमाणे घटकाचा समावेश आहे .त्यांचा अनुदानाचा तपशील :
|
अनु क्रंमांक |
बाब |
उच्चतम अनुदेय रक्कम |
|
१ |
नवीन विहीर |
२५००००/- |
|
२ |
जुनी विहीर दुरुस्ती |
५००००/- |
|
३ |
इनवेल बोअरिंग |
२००००/- |
|
४ |
वीज जोडणी आकार |
१००००/- |
|
५ |
शेततळ्याचे अस्तरीकरण |
१०००००/- |
|
६ |
सूक्ष्म सिंचन संच १. ठिबक २.तुषार |
५००००/- .२५०००/- |
|
७ |
पंप संच (डीजेल /विद्धुत ) |
२००००/- |
सदर योजनेंतर्गत वरील ०७ बाबी असून लाभ
पकेज स्वरुपात द्यावयाचा आहे . खालील तीन
पकेज मधील एकाच पकेज चा लाभार्थ्यास अनुनेय राहील .
१. 1. नवीन विहीर पकेज : नवीन विहीर ,पंप संच , वीजजोडणी आकार , सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरवेल
२. 2. जुनी विहीर दुरुस्ती पकेज : जुनी विहीर दुरुस्ती , पंप संच , वीजजोडणी आकार , सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरवेल
३. 3. शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पकेज : शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण ,पंप संच ,वीजजोडणी आकार ,सूक्ष्म सिंचन संच .
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना पात्रता :
१. 1. लाभार्थी अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे .
२. 2. जात प्रमाणपत्र आवश्यक
३. 3. ज्या शेतकर्यांना नवीन विहीर या घटकांचा लाभ घ्य्व्याचा आहे त्यांच्यासाठी किमान ०.४० हे शेतजमीन
"krushi swavlamban yojana"असणे आवश्यक आहे.
४. 4.नवीन विहीर व्यक्तिरिक्त
इतर घटकांसाठी किमान ०.२० हे क्षेत्र असणे
आवश्यक आहे.
५. 5. कमाल क्षेत्र ६.०० हे
पर्यंत असणे आवश्यक
६. 6.शेतकर्याचे नावे ७/१२ व ८अ उतारा असणे आवश्यक .
७. 7.आधारकार्ड
८. 8. बँक खाते ( आधार कार्डशी
लिंक खाते )
९. 9.वार्षिक उत्पन्न १५००००/-
च्या आतील असणे आवश्यक .
आवश्यक कागदपत्रे :
अ) नवीन विहिरीकरिता:
१. जात प्रमाणपत्र
२. ७/१२ व ८ अ उतारा
३. उत्पन्न दाखला तहसीलदार
यांचा १५००००/- आतील.
४. अपंग असल्यास प्रमाणपत्र
५. लाभार्थीचे प्रमाणपत्र १००
च्या स्टंप वर
६. तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (०.४०-६ हे मर्यादेद ) प्रस्तावित विहीर दुसर्या विहिरी पासून ५०० फुटापेक्षा जास्त अंतरावर असेलच दाखला ,नकाशा. चतुर्सिमा ७. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
८. कृषि
अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफार
९. गट विकास
अधिकारी यांचे शिफारसपत्र
१०.ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे
त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
११.. ग्रामसभा ठराव
ब ) जुनी विहीर दुरुस्ती / इनवेल
बोअरिंग या बाबीसाठिया :
1.जात प्रमाणपत्र
१३.७/१२ व ८ अ उतारा
१४.उत्पन्न दाखला तहसीलदार यांचा १५००००/- आतील.
१५.लाभार्थीचे प्रमाणपत्र १०० च्या स्टंप वर
१६.तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (०.४०-६ हे मर्यादेद ) प्रस्तावित विहीर दुसर्या विहिरी पासून ५०० फुटापेक्षा जास्त अंतरावर असेलच दाखला ,नकाशा. चतुर्सिमा
१७.बंधपत्रे १०० रु स्टंप पेपर वर
१८.कृषि अधिकारी (विघयो) यांचे
क्षेत्रीय पाहणी व शिफार
१९. गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
२०.ज्या जागेवर जुनी विहीरदुरुस्ती
/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाची आहे त्याजागेचा
फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
२१.. ग्रामसभा ठराव
क)शेततळ्यास
अस्तरीकरण /वीज जोडणी आकार /पंप संच /सूक्ष्म सिंचन संच या बाबीकरिता :
१. जात प्रमाणपत्र
२. १५००००/- रु पर्यत तहसीलदार
यांचा उत्पन्न दाखला
३. ७/१२ व ८ अ उतारा
४. एकूण जमीन धारणा क्षेत्र
०.२०-.६ हे पर्यंत
५. ग्रामसभा ठराव
६. शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वा
बाबतचे हमी पत्र (१००/५०० रु स्टंप पेपरवर )
७. काम सुरु करण्यापूर्वीचा फोटो
८. विधूत कनेक्शन व विधूत
पंपसंच नसलेबाबत हमीपत्र

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !