पावसामुळे पिकाचे नुकसान झाले मोबाईल वरून द्या विमा कंपनीला सूचना - Pik Vima suchana

 पावसामुळे पिकाचे नुकसान झाले मोबाईल वरून द्या  विमा कंपनीला  सूचना -Pik Vima suchana 

आपण  आपल्या पिकाचा पिक विमा काढलेला असेल व पावसाच्या पाण्याने पिकाचे नुकसान झाले असेल तर आपल्याला आपल्या पिकाची नुकसानीची माहिती पिक विमा कळविणे खूप गरजेचे असते त्यामुळे ती माहिती कशी कळवावी या साठी हा लेख खूप महत्वाचा ठरणार आहे . 

राज्यात कधी दुष्काळ , अवकाळी. किवा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी , कीड व रोग या मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे पिकांचे नुकसान भरून निघण्यासाठी केंद्र सरकारे  प्रधानमंत्री फसल बिमा योजना सुरु केली आहे. त्यानुसार शेतकर्यांनी आपल्या पिकाचा विमा खरीप, हंगामात  विमा काढतो 'Pik Vima suchana' त्यानुसार जर पिकाचे अतिवृष्टी , दुष्काळ, कीड व रोगामुळे पिकाचे नुकसान झाले तर आपल्याला त्या पिकाचा नुकसानी नुसार त्या पिकाची भरपाई मिळते.

Pik Vima suchana
Pik Vima suchana 


पिक विमा कसा काढायचा.

    पिकाची लागवड केल्या नंतर खरीप हंगामात शासना तर्फे आपल्याला पिक विमा काढा असे  आवाहन किवा जाहिरतीद्वारे आपल्याला पिक विमा काढावा असे सांगितले जाते.   आपण पिक हा स्वतः ओनलाइन काढू शकतो किवा csc( आपले सरकार सेवा केंद्र ) यांच्या मार्फत काढू शकतो.



पिक विमा भरपाई कश्या साठी मिळते.

 आपण आपल्या पिकाचा विमा काढला आहे . परंतु आपल्या भरपाई कश्या प्रकारे व कशी मिळू शकते या विषयी आपण आता माहिती बघू

             पिक विमा  योजने नुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती (गारपीट, भूस्‌खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज  कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग) व काढणी पश्चात नुकसान भरपाई (गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस) या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे काढणी नंतर 14 दिवसा "Pik Vima suchana" पर्यंत झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना नुकसानीच्या 72 तासाच्या आत  सदर विक विमा कंपनीला देणे आवश्यक आहे . जर पिक विमा कंपनीला माहिती कळवली तरच आपलाला  नुकसान भरपाई मिळू शकते .

पिक नुकसानीची सूचना :

पिक नुकसानीची तुमच्या शेतातील नुकसान ग्रस्त पिकाची नोंद तुम्ही स्वत : पिक विमा कंपनीस सादर करू शकतो आणि  या बदल्यात तुम्हाला पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकेल.

 सदर विमा कंपनीला आपल्या पिकाची माहिती आपन ०२ प्रकारे देऊ शकतो.

१. 1.  मोबाईल अप्लिकेशन द्वारे

२.   2.टोल फ्री क्रमांका वर माहिती कळवून

वरील घटकांची  माहिती आपण सविस्तर बघू  .

३.  अ ) मोबाईल अप्लिकेशन द्वारे –

१.    प्रथम आपण मोबाईलमध्ये प्ले स्टोर मधून Crop Inshurance App  हि आप डाऊनलोड करावी ––

२.  डाऊनलोड झाल्यानतर त्याला  ओपन करावे .त्यानंतर एक होम पेज ओपन होईल .

३.  त्यात “continue Without Login” यावर क्लिक करावे .

४.  त्या नंतर”Crop loss” याला सिलेक्ट करावे.

५.  नंतर  crop lose intimation सिलेक्ट

६.  मोबाईल नंबर टाकणे .नंतर otp टाकून ओके करणे 

७.  नंतर एक पेज  ओपेन होईल त्यात प्रथम season मध्ये kharip टाकावे .

year मध्ये २०२३ टाकावे .scheme मध्ये pradhan madtri fasal bima yojana टाकावे . state मध्ये maharastra टाकावे. silect करावे .

८.  नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन कुठे केले ते विचारेल तेथेcsc ase सिलेक्ट करावे

९.   खाली आपल्याकडे पिक विमा काढल्याची रजिस्टर नं असेल तेथे क्लिक करावे  अन्यथा सिलेक्ट ऑप्शन ला क्लिक करावे .

१०.      Location Details हे पेज ओपेन होईल.

११.      त्यात आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून द्यावी. त्यात राज्य,जिल्हा , तालुका , महसूल सर्कल , ग्रामपंचायत ,गावाचे नाव , पिकाचे नाव , सर्वे नं ( गट नं ) , सबडीवीजन नं ( खाते नं ) टाकणे . ओके ला क्लिक करणे .

१२.  नंतर तेथे आपला पॉलिसि नं दिसेल त्याला क्लिक करावे ,त्यानात्र्र आपली संपूर्ण माहित तेथे उपलब्ध होईल.

१३.   त्यात खालच्या भागात चौकटीला क्लिक करावे .त्यानंतर report incidence हे पेज ओपेन होईल . 

१४.                त्यातtype ऑफ  incidence मध्ये नुकसानीचा प्रकार टाकावा खाली , नुकसानीची तारीख टाकावी. नुकसानीच्या वेळेस पिक कोणत्या स्टेज ला होते. ते टाकावे, किती प्रमाणात नुकसान झाले ते भरावे, रेमार्क द्यावा . नंतर पिकाचा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन फोटो काढून अपलोड करा वा  गरज वाटल्यास  विडीओ  देखील अपलोड करावा . व नंतर submit करावा

१५.                त्यानंतर तेथे आपल्या एक नंबर जनरेट होईल तसेच तो आपल्या मोबाईल नं वर देखील  MSG पाठवला जाईल. त्या नंबर वर आपण आपल्या विमाची स्थिती status पाहू शकतो    

B)  टोल फ्री नंबर वर कॉल करून _

    पिकाचे नुकसान झाल्यानंतर पिकाची नुकसानीची माहिती कळविण्यासाठी  विमा कंपनीने एक टोल फ्री नं देण्यात असा असून तो   १८००११८४८५  असून सदर मोबाईलनंबर  कॉल करून आपल्या पिकाची माहिती विमा कंपनीला कळवू शकतो .

 

 

 

 

 

 







Post a Comment

0 Comments