आपण केलेली ई पिक पाहणी झाली कि नाही असे चेक करा .E Pik Pahani status

आपण केलेली ई पिक पाहणी झाली कि नाही असे चेक करा .E Pik Pahani status       

            महाराष्ट्र  शासनाने शेतकर्यांना आपला पिकाचा पिक पेरा लावण्यासाठी E Pik Pahani’ हे  ॲप  तयार करण्यात आले  आहे त्यानुसार शेतकरी आपल्या पिकाचा पिक पेरा स्वत: शेतात जावून लावू शकतात . परंतु जर आपण पिक पेरा न लावल्यास आपले क्षेत्र पडीत समजले जाईल . त्यामुळे शेतकर्याने आपल्या शेतात कोणतेच पिक घेतले असे  समजून सदर क्षेत्र पडीत क्षेत्र समजले जाईल.

 

E Pik Pahani status
E Pik Pahani status  

 E Pik Pahani status  

      जर आपण आपल्या पिकाची नोंदणी ७/१२ उतारावर केली नाहीतर तर आपल्याला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई ,  पिक विमा किवा  आपण घेत असलेले पिक कर्ज मिळणार:E Pik Pahani status "नाही त्यामुळे वरील अनुदान लाभ घेण्यासाठी आपणास   ई पिक पाहणी करणे अनिवार्य आहे.


ई पिक पाहणी करणे का महत्वाचे :  

तसेच मागील काही महिन्या पूर्वी कांदा चे भाव  खूप कमी झाले होते तेव्हा शासनाने कांदा पिकाला प्रतीप्क्विंटल  रु ३००/- इतके अनुदान जाहीर केले होते . तेव्हा शेतकर्यांनी आपला कांदा विक्री साठी आणला परंतु त्या अनुदानासाठी शेतकऱ्याचा ७/१२ उतारावर  कांदा या पिकाची नोंद असणे आवश्यक होते .त्यामुळे बरेच शेतकरी या योजने पासून वंचित राहिले. त्यामुळे कोणीही  शासकीय अनुदाना पासून वंचित राहू नये या साठी प्रत्येक शेतकरी यांनी आपण घेत असलेला पिकाची ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे

ई पिक पाहणी कशी करावी:

   शासनाने  वेळोवेळी पिक पाहणी करण्यासाठी आपल्याला माहिती देत असते किवा आवाहन करत असते  तसेच पिक पाहणी साठी शासनाने “ ई पिक पाहणी : व्हर्जन २.०.१२ हे अपडेट version देण्यात आलेले असून ते आपण गुगल प्ले स्टोर मधून डाऊनलोड करून घेऊ शकतो .

पिक पाहणी करणे का  गरजेची

नुकसान भरपाई, पिक विमा , इतर शासकीय अनुदान ,तसेच पिक कर्ज काढण्यासाठी ७/१२ उतारावर  सदर पिकाची नोंद असणे गरजेचे असल्याने सर्वांनी आपल्या पिकाची ई पिक पाहणी अपवर नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही शासकीय अनुदान पासून वंचित राहणार नाही त्यामुळे पिक पाहणी करणे हे खूप महत्वाचे आहे.

ई पिक पाहणी करणे .

 आपण “ ई पिक पाहणी ॲप  डाऊनलोडकेल्यानंतर संपूर्ण खातेदाराची माहिती भरून  झाल्यानतर ,पिकाची माहित तसेच पिकाचा फोटो काढून माहिती अपलोड केली. परंतु आपली "E Pik Pahani status" अपलोड केलेली माहितीची नोंद व्यवस्थित  झाली कि नाही . हे कसे चेक करावे , त्याची माहिती कुठे पहावी ? हे आता आपण पाहू.  

असे चेक करा ई पिक पाहणी स्टेटस :

Ø प्रथम प्ले स्टोर  वरून “ ई पिक पाहणी” हे आप डाऊनलोड करून घ्यावे.

Ø खातेदाराची निवड करून झाल्यानतर ॲप चे होम पेज ओपेन होईल . त्यात खालील दिलेल्या स्क्रीन शॉट मधल्या आयकॉन ला क्लिक करावे.

E Pik Pahani status
E Pik Pahani status  2


E Pik Pahani status
E Pik Pahani status  3


Ø क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या गावाची संपूर्ण यादी दिसेल . त्या यादी मध्ये आपले नाव चेक करावे . आपल्या नावापुढे हिरवा रंग दर्शविला असेल तर आपली पिक पाहणी झाली आहे असे समजावे .जर नावापुढे हिरवा रंग दर्शविला नसेल तर पिक पाहणी झाली नाही असे समजून पुन्हा “ ई पिक पाहणी पाहणी पूर्ण करावी .

गावातील ज्याची पिक पाहणी झाली नाही अशा नावांसमोर पांढऱ्या रंगाने दर्शविली आहे.

“ ई पिक पाहणी माहिती दुरुस्ती :

 आपण “ ई पिक पाहणी” पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्या  आपल्याला ४८ तासाच्या आत कराव्या लागतील ४८ तासानंतर आपले नाव सदर यादी मध्ये जोडले जाईल  .जर पिक पाहणी करूनही आपले  नाव पिक पाहणी आपल  दिसत नसेल ते आपली “ ई पिक पाहणी “ व्यवस्थित झालेली नाही असे समजून पुन्हा नोंदणी करावी.

Post a Comment

0 Comments