बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना – Birsamunda Munda Krushi Kranti Yojana
Birsamunda Munda Krushi Kranti Yojana:
आदिवासी शेतकर्याचे उत्पादनात वाढ करून त्यांचे राहणीमान
उंचावण्यासाठी अनुसूचित जमातीतील
शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी सन १९९२-९३ पासून राबविण्यात येत
असलेली आदिवासी उपयोजना बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांची आवश्यकता लक्षात घेऊन सदर योजनेचे नाव बदलून बिरसा मुंडा कृषीक्रांती योजना या नावाने ३० डिसेंबर २०१७
पासून राबविण्यात येत आहे.
![]() |
| Birsamunda Munda Krushi Kranti Yojana |
शासनाने आतापर्त्यायंत आदिवासी समाजातील शेतकऱ्सायांसाठी मोठ्ठीया प्रमाणात योजना राबविल्या जात आहे . परंतु हि योजना आदिवासी शेतकर्यांसाठी खूप उपयुक्त ठरली आहे. त्यात शासनाने वेगवेगळ्या वेगवेगळ्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे त्या बाबीची माहिती खालील प्रमाणे .
सदर योजनेतखालीलप्रमाणे घटकाचा समावेश आहे .त्यांचा अनुदानाचा तपशील :
|
अनु क्रंमांक |
बाब |
उच्चतम अनुदेय रक्कम |
|
१ |
नवीन विहीर |
२५००००/- |
|
२ |
जुनी विहीर दुरुस्ती |
५००००/- |
|
३ |
इनवेल बोअरिंग |
२०००० |
|
४ |
वीज जोडणी आकार |
१००००/- |
|
५ |
शेततळ्याचे अस्तरीकरण |
१०००००/- |
|
६ |
सूक्ष्म सिंचन संच १. ठिबक २.तुषार |
५००००/- .२५०००/- |
|
७ |
परसबाग |
५००/- |
|
८ |
पंप संच (डीजेल /विद्धुत ) |
२००००/- |
|
९ |
PVC पाईप्स |
३००००/- |
योजना लाभार्याचा पात्रतेच्या अटी खालीलप्रमाणे :
१. १.सदर लाभार्थी हा अनुसूचित जमातीतील असणे बंधन कारक'Birsamunda Munda Krushi Kranti Yojana' आहे .
२. २. लाभार्थी शेतकर्याकडे जातीचे
प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
३. ३. नवीन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर
क्षेत्र असणे बंधकारक आहे. इतर घटकांसाठी किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक
आहे.
४. ४. स्वताच्या नावे ७/१२ आणि ८अ उतारा असणे
गरजेचे आहे .
५. ५.आधार कार्ड
६. ५.शेतकर्याचे
उतन्न १५००००/- पेक्ष्या जास्त नसावे.
७. ६. तहसीलदार यांचा उत्पन दाखला
७. ७.एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय नाही.
नवीन विहिरीसाठी आवश्यक कागदपत्रे :
१.
लाभार्थी यांचा जातीचा दाखला
२.
७/१२ उतारा व ८अ उतारा
३.
उत्पन दाखला (तहसीलदार )
४.
अपंग असल्याचे प्रमाणपत्र
५.
१००/५०० रु स्टंप पेपर वर प्रतिज्ञापत्र
६. तलाठी यांचा विहीर नसल्याबाबत चा दाखला . जेथे विहिरीची जागा निश्चितKrushi Kranti Yojana केल्याल्या जागे पासून दुसरी विहीर ५०० फुटापेक्ष्या लांब अंतरावर असल्याचा दाखला ,प्रस्तावित"Birsamunda Munda Krushi Kranti Yojana" विहिरीचा नकाशा व चातुर्सिमा
7. भूजल सर्वेक्षण विकास
यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
8) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
9) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
10) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह
व लाभार्थी सह).
11) मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प
यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करूनदिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
12) ग्रामसभेचा ठराव.
जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता:
1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील
अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
2) तहसीलदार यांचेकडील मागील
वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत ) किंवा दारिद्रय
रेषेखाली असलेबाबतचे प्रमाणपत्र / BPL कार्ड (लागू असलेस).
3) 7/12 दाखला व 8अ उतारा.
4) ग्रामसभेचा ठराव.
5) तलाठी यांचेकडील दाखला - एकूण
धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत
प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे
नं. नकाशा व चतु:सीमा.
6) लाभार्थीचे बंधपत्र (100/500
रु च्या स्टॅम्प पेपरवर).
7) कृषि अधिकारी (विघयो) यांचे
क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
8) गट विकास अधिकारी यांचे
शिफारसपत्र
9) ज्या विहीरीवर जुनी विहीर
दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू
होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
10) इनवेल बोअरींगसाठी भूजल
सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
11) अपंग असल्यास प्रमाणपत्र
12) मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या
विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून
लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी
आकार / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीता:
1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील
अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
2) तहसीलदार यांचेकडील मागील
वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ) किंवा दारिद्रय
रेषेखाली असलेबाबतचे प्रमाणपत्र / BPL कार्ड (लागू असलेस).
3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
4) तलाठी यांचेकडील एकूण धारणा
क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत)
5) ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
6) शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे
हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
7) काम सुरू करण्यापूर्वीचा
फोटो (महत्वाची खुणेसह)
8) विद्युत कनेक्शन व विद्युत
पंपसंच नसलेबाबत हमीपत्र
9) मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प
यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A)
अंतर्गत उपलब्ध करून
दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
10) प्रस्तावित शेततळ्याचे मापन
पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि
अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.
अशा प्रकारे शेतकरी वरील
बिरसा मुंडा कृषीक्रांती योजने साठी महाडीबीटी
पोर्टल मधून अर्ज करून वरील योजनाचा कृषी विभागाकडून अनुदानाचा लाभ घेऊ
शकतात.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !