आयुष्मान भारत कार्ड डाऊनलोड करा अगदी सहज .Ayushman Bharat Card

 Ayushman Bharat Card 

     आयुष्मान कार्ड ही एक सरकारी योजना आहे जी भारतीय आरोग्य संघटनेद्वारे चालवली जाते. तिचे पूर्ण नाव प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाआहे. ही योजना भारत सरकारद्वारे चालवली जाते आणि गरीब लोक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना स्वस्त आणि उच्च-दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट आहे.

       आयुष्मान कार्ड भारतातील सर्व राज्यांमध्ये लागू आहे आणि या अंतर्गत गरीब लोकांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला पात्रता निकष पूर्ण करावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही वैद्यकीय सुविधांचा लाभ घेऊ शकता.

      आयुष्मान कार्ड अंतर्गत लाभार्थी कुटुंबातील सर्व सदस्यांना वैद्यकीय सुविधा मोफत मिळतात. यामध्ये संस्था आणि रुग्णालये यांच्याशी संबंधित नेटवर्क देखील समाविष्ट आहेत.

Ayushman Bharat Card
Ayushman Bharat Card 

Ayushman Bharat Card आयुष्मान कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी प्रत्येकाला काय करावे लागेल?

आयुष्मान भारत योजने चे कार्ड डाऊनलोड करण्यसाठी दोन प्रकिया आहेत ,पहिली प्रकिया म्हणजे  आधार कार्ड  वरून  आयुष्मान कार्ड डाऊनलोड करणे . दुसरे म्हणजे मोबाईल नंबर वरून आयुष्मान भारत कार्ड डाऊनलोड करणे .

योजनेचा उद्देश :

 भारतातील गरीब आणि निराधार लोकांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे .

आयुष्मान कार्ड चा फायदा काय?

        PMJAY CARD कार्ड चा सर्वात मोठा फायदा  म्हणजे या योजनेंतर्गत कुटुंबातील सर्व लाभ्यार्थाना रु ५०००००/ पर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो .जर आयुष्मान कार्ड धारकाला गंभीर आजार झाला  असेल तर रुग्णालयाचा सर्व खर्च सरकार उचलते.
           आयुष्मानकार्ड हे भारत सरकारच्या प्रधान मंत्री आरोग्य  योजनेचा एक भाग आहे. या कार्डचे अनेक फायदे आहेत . जे खालील प्रमाणे आहेत.

  मोफत वैद्यकीय सुविधा :आयुष्मान भारत

 कार्ड  धारकांना  ५०००००/- रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय सुविधा दिला  जाते . या अंतर्गत व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय खर्च, शस्रक्रिया,औषधे ,चाचण्या आदी खर्च दिले जातात

.निवासी वैद्यकीय सुविधा :या योजनेंतर्गत केवळ  वैद्यकीय सुविधाच पुरवल्या जात नाहीत. कार्डधारकांना हॉस्पिटललायजेषणची आवश्यकता असल्यास ते निवासाचा लाभ घेऊ  शकतात. आरोग्य कवच, आयुष्मान कार्ड योजनेंतर्गत  धारकांना आरोग्य कवच प्रदान केले जाते. या अंतर्गत त्यांची  नियमित वैद्यकीय तपासणी ,लसीकरण , गर्भधारणा , बालकांचे आरोग्य इ.

संपूर्ण कुटुंबाला  लाभ :

   या योजनेंतर्गत  कौटुंबिक संरक्षण देखील प्रदान केले जाते. या अंतर्गत कुटुंबातील सदस्यांना मोफत वैद्यकीय सुविधाही मिळतात.Ayushman Bharat Card 

 आयुष्मान भारत कार्ड कसे डाऊनलोड करावे

                आयुष्मान  भारत कार्ड डाऊनलोड  करण्यसाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किवा लंपटोप मधील क्रोम ब्राउझरवर  जावे लागेल .

तेथे सर्च बॉक्स मध्ये Bis.pmjay.gov.in लिहावे लागेल .

वरील लिंक क्लिक करताच तुमच्या समोर एक पेज उघडेल जिथे तुम्हाला प्रथम डाऊनलोड 

आयुष्मान कार्ड लिहलेल्या बॉक्स दिसेल त्यावर क्लिक करावे .

 त्यांनतर तुम्हाला आधार चा बॉक्स दिसेल त्याला निवडावे.

नंतर scheme चा पर्याय दिसेल त्यामध्ये pmjay निवडावे नंतर state मध्ये maharastra सिलेक्ट करावे 

नंतर खाली आधारकार्ड नंबर टाकावा .

      generate otp ऑप्शन ला सिलेक्ट करावे त्यांनतर आधार लिक मोबाईलनंबर ला otp जाईल तो otp खाली

 लिहावा.व verify ला ओक करावे.त्यानंतर तुम्हाला एक पेज ओपेन होईल त्यावर डाऊनलोड कार्ड असे ऑप्शन

 दिसेल त्याला क्लिक करून कार्ड डाऊनलोड करू शकतो .

 मोबाईल नंबर वरून भारत कार्ड डाऊनलोड कसे करावे:

         मोबाईल वरून  आयुष्मान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी  तुम्हाला स्वतःkyc करावे लागेल आणि नवीन पोर्टल मध्ये एक ID तयार करावा लागेल  त्याच id वरून तुम्ही आयुष्मान कार्ड डाऊनलोड करू शकता .

प्रथम मोबाईलवरील क्रोम ब्राउझर वर जा तेथे सर्च बॉक्स मध्ये https://setu.pmjay.gov.in/setu/smile-tss
 लिहा.त्यांनतर  आयुष्मान कार्ड बनवताना तुम्हाला आयुष्मान पोर्टल साठी मिळालेला आयडी  टाकून तुम्हाला  साईन इन करावे लागेल .तुम्ही येथे साईन इन करताच तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला डाऊनलोड आयुष्मान कार्ड लिहलेल दिसेल  तुम्ही त्यावर क्लिक करताच तुम्हाला एक नवीन पेज  उघडेल जिथे तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव निवडण्यास सांगितले जाईल . राज्याचे नाव निवडल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल तुम्ही आधार कार्ड नंबर टाकताच  तुमच्या मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असल्याची पडताळणी करण्यासाठी एक OTP येतो . 
त्यानंतर तुम्हाला otp  टाकून पडताळणी करावी लागेल otp verify होताच"Ayushman Bharat Card"  तुमच्या समोर एक पेज उघडेल जिथे तुम्हाला आयुष्मान कार्ड PDFमध्ये डाऊनलोडकरण्याचा पर्याय दिसेल  .
  तिथे क्लिक करून तुम्ही आयुष्मान कार्ड PDFअगदी सहज डाऊनलोड करू शकता .

   

Post a Comment

0 Comments