शेळ्या व मेंढ्या विकत घेण्यासाठी मिळणार ५०-७५ टक्के अनुदान असा करा योजनेसाठी अर्ज – Shelya Mendhya Anudan Yojna 2023
Shelya Mendhya Anudan Yojna 2023
आजच्या लेखात आपण महाराष्ट्र शासन
पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणारी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय शेळ्या व
मेंढ्या यांचे वाटप करणे या योजने विषयी माहिती घेणार आहेत.
महाराष्ट्रा शासनाने शेळीपालन या व्यवसायासाठी शेतकर्यांना आर्थिक सहायता मिळावी 'Shelya Mendhya Anudan Yojna 202३'म्हणून शासनाने तब्बल ५०-७५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय शासनाने २५ मे २०२१ मध्ये घेतला त्यानुसार आत्ता शेळ्या व मेंढ्या घेण्यासाठी ५०-७५ टक्के अनुदान मिळते . शेळ्या व मेंढ्या पालन व्यवसायातून रोजगार निर्मिती होणार आहे .त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे तसेच शेतकर्यांना शेती व्यवसायाला जोड धंदा म्हणून एक उत्पनाचा स्रोत निर्माण होणार आहे .चला तर मग आता योजनेचे स्वरूप ,कोण लाभार्थी पात्र असू शकता, अनुदान कसे व कुठे मिळणार ,अर्ज कसा करायचा या विषयी संपूर्ण माहिती बघू .
![]() |
Shelya Mendhya Anudan Yojna 2023 |
योजनेचे स्वरूप :
या योजनेंतर्गत
लाभार्थ्यांना उस्मानाबादी /संगमनेरी
अथवा स्थानिक वातावरणात तग धरणारी १० शेळ्या व १ बोकड अथवा १० मेंढ्या व
१ नर मेंढा यांचे वाटप करण्यात येणार आहे .
योजनेचे निकष :
१)
दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१
हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते
२ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार (
रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी
एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील .
|
अ.क्र. |
तपशील |
दर(रक्कम रुपयात ) |
१० शेळ्या व १ बोकड (रक्कम
रुपयात) |
|
1 |
शेळ्या खरेदी |
८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी
जातीच्या पैदासक्षम ) |
८०,०००/- (१० शेळ्या ) |
|
2 |
बोकड खरेदी |
१०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर
) |
१०,०००/- (१ बोकड ) |
|
3 |
शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी ) |
१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) |
रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी ) |
|
4 |
शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) |
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित |
|
|
एकूण खर्च |
१,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी ) |
|
अ.क्र. |
तपशील |
दर(रक्कम रुपयात ) |
१० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात) |
|
1 |
मेंढया खरेदी |
१०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ ) |
१,००,०००/- (१० मेंढया ) "Shelya Mendhya Anudan Yojna 2023 |
|
२" |
नरमेंढा खरेदी |
१२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ) |
१२,०००/- (१ नरमेंढा ) |
|
3 |
मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी ) |
१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) |
रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी ) |
|
4 |
मेंढ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) |
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित |
|
|
एकूण खर्च |
१,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी ) |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा
खालीलप्रमाणे राहील
|
अ.क्र. |
गट |
प्रवर्ग |
एकूण किंमत |
शासनाचे अनुदान |
लाभार्थ्याचा स्वहिस्सा |
|
1 |
शेळी गट - उस्मानाबादी /संगमनेरी |
सर्वसाधारण |
१,०३,५४५/- |
५१,७७३/- |
५१,७७२/- |
|
अनु. जाती व जमाती |
१,०३,५४५/- |
७७,६५९/- |
२५,८८६/- |
||
|
2 |
शेळी गट - अन्य स्थानिक जाती |
सर्वसाधारण |
७८,२३१/- |
३९,११६/- |
३९,११५/- |
|
अनु. जाती व जमाती |
७८,२३१/- |
५८,६७३/- |
१९,५५८/- |
||
|
3 |
मेंढी गट - माडग्याळ |
सर्वसाधारण |
१,२८,८५०/- |
६४,४२५/- |
६४,४२५/- |
|
अनु. जाती व जमाती |
१,२८,८५०/- |
९६,६३८/- |
३२,२१२/- |
||
|
४ |
दख्खनी व अन्य स्थानिक जाती |
सर्वसाधारण |
१,०३,५४५/- |
५१,७७३/- |
५१,७७२/- |
|
अनु. जाती व जमाती |
१,०३,५४५/- |
७७,६५९/- |
२५,८८६/- |
१) * फोटो
ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) * सातबारा
(अनिवार्य)
३) * ८
अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य
दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड
(अनिवार्य )
६) * रहिवासी
प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) * बँक
खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) * रेशनकार्ड
/ कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
९) * ७-१२
मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा
(असल्यास अनिवार्य)
१०) * अनुसूचीत
जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य
रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग
असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
१३) बचत गट सदस्य
असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या
पानाची साक्षांकित प्रत
१४) वय -
जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक
पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची
सत्यप्रत
१७) प्रशिक्षण
घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
योजनेसाठी अर्ज कसा करायचा :
पशुसंवर्धन विभागाच्या
वैयक्तिक योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला https://ah.mahabms.com या वेबसाईट व AH-MAHABMS
या मोबाइल अप्लिकेशन वापर करून किवा आपल्या जवळच्या csc केंद्रात
जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता .अर्ज भरल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाइल नं वर अर्जाची
स्थिती बाबतचे संदेश पाठवले जातात.
एकदा या योजनेसाठी अर्ज केल्या नंतर पुन्हा ५ वर्ष आपले नाव
प्रतीक्षा यादीत राहील .
दुधाचा व्यवसाय करायचा आहे का ? चला तर मग येथे करा पशुसंवर्धन विभागाचा ५०-७५ टक्के गाई –म्हशी अनुदान योजने साठी असा करा अर्ज –MahaBms Yojana 2023

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !