आता रब्बी हंगामासाठी पण १ रुपयातच पिक विमा - Rabbi
Crop Inshurance 2023
प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३
केंद्र शासनाची “प्रधानमंत्री पिक बिमा योजना” हि महाराष्ट्रात २०१६ सालापासून सुरु आहे . त्या योजनेत महाराष्ट्र सरकार ने काही बदल करण्याचा निर्णय घेतला असून त्या नुसार आता शेतकऱ्यांना विमा काढण्यासाठी नाममात्र ०१ रुपयात विमा काढण्याची सोय महाराष्ट्र शासनाने केली आहे .Rabbi Crop Inshurance 2023
![]() |
Rabbi Crop Inshurance 2023 |
पिक विमा योजनेत झालेले बदल :
पूर्वी पिक विमा काढण्यासाठी हेक्टरी
आरक्षित केलेल्या रकमेच्या २% रब्बी
हंगामासाठी १.५ % विमा संरक्षित रकमेच्या हफ्ता भरावा लागायचं ती रक्कम ७००,१०००,१२०० पर्यंत प्रतीहेक्टरी होयची . आता ती सर्व रक्कम सरकार भरणार आहे
.शेतकर्यांना फक्त १ रुपयाच भरून पिक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे . यात कर्जदार
आणि बिगर कर्जदार शेतकरी यांच्यासाठी हि योजना ऐच्छिक करण्यात आली आहे . तसेच जे शेतकर्यांनी
शेती हि भाडेतत्वावर घेतली आहे ते सुधा शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात.
पिक विमाची गरज :
गेल्या ३-४ वर्षापासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस
, धुके या मुळे रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते परिणामी शेतीचे उत्पन
कमी होते . तसेच योजनेच्या
मार्गदर्शक सुचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती (गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित
क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज
कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग) व काढणी पश्चात नुकसान भरपाई (गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे
आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस) या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या
अधिसुचित पिकाचे काढणी नंतर 14 दिवसा पर्यंत
झालेल्या नुकसान "Rabbi Crop Inshurance 2023"यासाठी पिक विमा काढणे गरजेचे आहे.
कोणत्या पिकाचा समावेश?
पिक विमा योजनेत रब्बी हंगामासाठी खालील पिकांचा
समावेश होतो .
१. गहू
२.रब्बी कांदा
३.ज्वारी ( जिरायत आणि बागायत )
४. हरभरा
५.उन्हाळी भात
६.उन्हाळी भुईमुग
आवश्यक कागदपत्रे :
१. आधार कार्ड
२.बँक पासबुक
३.७ /१२ उतारा
४.८ अ उतारा
५.पिक पेरा स्वयंघोषणापत्र
फॉर्म कुठे भरायचा :
पिक विमा भरण्यासाठी आपल्या गावातील जवळच्या
csc ( आपले सरकार सेवा केंद्र ) , बँक
येथे जाऊन आपण पिक विमा भरू शकतो , अधिक माहिती साठी आपण आपल्या गावातील
कृषी सहायक , तालुका कृषी अधिकारी याच्याशी संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकतो .
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
खालील प्रमाणे पिकानुसार पिक विमा काढण्याचा शेवटची तारीख .
|
पिकाचे नाव |
शेवटची तारीख |
|
ज्वारी
(बागायत जिरायत ) |
३० नोव्हेबर |
|
गहू |
१५ डिसेंबर |
|
रब्बी कांदा |
१५ डिसेंबर |
|
हरभरा |
१५ डिसेंबर |
|
उन्हाळी भात |
३१ मार्च २०२४
|
|
उन्हाळी भुइमुग |
३१ मार्च २०२४
|

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !