आता या रेशनकार्ड धारकांना दरवर्षी मिळणार एक साडी मोफत - कॅप्टिव्ह मार्केट
योजना- Coptivha Market Yojana 2023
कॅप्टिव्ह मार्केट योजना
महाराष्ट्र शासनाने आपले२०२३ ते २०२८ सालापर्यंतचे "एकात्मिक व शास्वत वस्रोद्योग धोरण" जाहीर केले आहे. त्यात एक" कॅप्टिव्ह मार्केट योजना" तयार केली असून त्या नुसार राज्यातील दारिद्ररेषेखालील कुटुंबाला दरवर्षी ( २०२३-२०२८ पर्यंत ) एक मोफत साडी देण्यात येणार आहे . दारिद्ररेषेखालील( पिवळी शिधापत्रिकाधारकांना) कु टुंबांचा अंत्योदय अन्न योजना कु टुंब गटात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील अंत्योदय शिधापशिका धारक कु टुंबाना वस्त्रोद्योग विभागामार्फत दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची " कॅप्टिव्ह मार्केट योजना" सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
![]() |
Coptivha Market Yojana 2023
शासन निर्णय :
दिनांक ०२ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्याच्या
“एकात्मिक व शास्वत वस्रोद्योग धोरण “२०२३-२८ जाहीर करण्यात आलेआहे. सदर धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कु टुंबाना वस्त्रोद्योग विभागामार्फत
यंत्रमागावर विणलेली प्रती कु टुंब एक साडीचेमोफत वाटप करण्याची योजना या शासन निर्णयाने सुरु करण्यात येत आहे.तसाशासन निर्णय
दिनांक १० नोव्हेबर २०२३ रोजी प्रकाशित
करण्यात आला आहे.
योजनेचे स्वरूप :
१. योजनेचा कालावधी
कॅप्टिव्ह मार्केट योजना हि सन २०२३- २०२८
पर्यंत या ५ वर्षासाठी निश्चित करण्यात आली आहे.
२. लाभार्थी :
अ)
राज्यातील अंत्योदय शिधापशिका धारक असलेल्या कु टुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
३. वितरण व्यवस्था –
साड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक
वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येईल. लाभार्थाना रास्त भाव दुकानामधून साडी वितरीत
करण्यात येईल .
४. वितरणाचा कालावधी :-
शासनाने निश्चित केलेल्या
सणाच्या दिवशी अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रती कुटुंबाना दरवर्षी एक साडी मोफत वाटप करण्यात येईल .

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही .कृपया याला शासकीय वेबसाईट माणू नका .कमेंट बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर ,आधार कार्ड नं सारखे कोणत्याही प्रकारची माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संबधी तील तक्रारीकडे लक्ष देऊ शकत नाही .आम्ही सर्व अभ्य्ग्ताना संबधित तकारी ,योजनेबाबत क्कोरी किवा संकेतस्थळा वर प्रकाशित केलेली माहिती साठी सबंधित
विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकार्याना भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद !