फक्त 'PM-Kisan' नव्हे, आता प्रत्येकाकडे हवा 'शेतकरी आयडी' (AgriStack ID)! असा तपासा तुमचा आयडी आणि स्टेटस

शेतकरी आयडी (Agristack Id) 

नमस्कार शेतकरी बांधवानो आज पर्यंत आपण अनेक शेतकरी योजनेचा ( पी एम किसान योजना, पिक विमा योजना ,mahadbt च्या योजना अशा अनेक )लाभ घेतलेला आहे. परंतु तेव्हा आपणास फार्मर आयडी ची गरज नव्हती परंतु "केंद्र सरकारने 'डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रीकल्चर' अंतर्गत २०२६ पर्यंत सर्व शेतकऱ्यांना हा डिजिटल आयडी देण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यानुसार प्रत्येक शेतकरी बांधवानी फार्मर आयडी काढणे बंधन कारक केलेले असून ज्याच्या जवळ Agristack Farmar Id असेल त्याच शेतकर्यांना योजनेचा लाभ मिळेल . त्यासाठी आपल्या जवळ फार्मर आयडी असणे आवश्यक आहे .तसेच तो active असणे आवश्यक आहे .त्यांनाच पीक कर्ज (Crop Loan) सहज मिळेल. 

       आपल्याला फक्त पीएम किसानचा नंबर माहित होता. पण आता केंद्र सरकारने आधार कार्डसारखाच प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक युनिक शेतकरी आयडी (Unique Farmer ID) अनिवार्य केला आहे. यालाच 'अॅग्रीस्टॅक' (AgriStack) असेही म्हणतात. हा आयडी नसेल तर भविष्यात खते, बियाणे आणि विमा मिळणे कठीण होऊ शकते.



How to check Farmer ID status in Marathi
How to check Farmer ID status in Marathi


१. शेतकरी आयडी (Farmer ID) म्हणजे नक्की काय?


आपल्या आधारकार्ड प्रमाणे १२ अंकी युनिक नबर असून तो आधारकार्ड व आपला जमिनीचा ७/१२ उतारा याच्याशी जोडलेला आहे.



🔍 Farmer ID Status म्हणजे काय?

 1. फार्मर आय डी स्टेटस म्हणजे आपण काढलेला फार्मर कोणत्या स्थितीत आहे .
  • मंजूर झाला आहे का ✅
  • प्रक्रियेत आहे का ⏳
  • की Reject झाला आहे ❌

हे ऑनलाइन तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे.

२. तुमचा शेतकरी आयडी स्टेटस असा तपासा (Process):

हा आयडी महाराष्ट्र सरकारच्या 'महाडीबीटी' (MahaDBT) आणि केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी मिशन अंतर्गत तयार केला जातो.

  1. महाडीबीटी पोर्टलवर जा:

  2. mahadbt.maharashtra.gov.in वर तुमची प्रोफाइल तपासा.

  3. प्रोफाईल स्टेटस: तुमची वैयक्तिक माहिती ९०% ते १००% पूर्ण असल्यास तुमचा शेतकरी आयडी जनरेट होतो.

  4. Digital Crop Survey (ई-पीक पाहणी): जर तुम्ही ई-पीक पाहणी केली असेल, तर तुमचा आयडी आपोआप अपडेट होतो. त्याचे स्टेटस तुम्ही तुमच्या 'पीक पाहणी' ॲपमध्ये पाहू शकता.


३. आयडी स्टेटसमध्ये 'Pending' का दिसते?

जर तुमचा शेतकरी आयडी अजून सक्रिय झाला नसेल, तर त्याची मुख्य ३ कारणे असू शकतात:

  • जमीन पडताळणी (Land Verification): तुमच्या ७/१२ वरील नाव आणि आधारवरील नाव यात फरक असणे.

  • ई-केवायसी: आधार बायोमेट्रिक किंवा ओटीपी व्हेरिफिकेशन अपूर्ण असणे.

  • नकाशा लिंकिंग: जमिनीचा नकाशा (Map) आधारशी लिंक नसणे.


५. स्टेटस चेक करण्यासाठी महत्त्वाची लिंक:

  • महाराष्ट्र शेतकरी योजना स्टेटस: MahaDBT Portal

  • केंद्र सरकार शेतकरी डेटाबेस: Farmer Welfare Portal



1️⃣ Farmer ID Status कसा तपासायचा?

👉status तपासता येतो आपण अधिकृत website वरून चेक करता येतो .

2️⃣ Farmer ID Status पाहण्यासाठी कोणती माहिती लागते?

👹👉 आधारकार्ड ,मोबाईल  फोन, रजिस्ट्रेशन नंबर  

3️⃣ Farmer ID Status मोबाईलवर पाहू शकतो का?

👉 होय मोबाईल वर गुगल ब्राऊजर पाहता येऊ शकते .

4️⃣ Status “Pending” दाखवत असेल तर काय करावे?

👉 पेंडिंग दाखवत अस्र्ल तर आपल्या गावातील तलाठी कार्यालय  ,किवा तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क करावा .

6️⃣ Farmer ID किती दिवसात तयार होतो?

 👉 साधारणपणे फार्मर आयडी 8-१५ दिवसात तयार होतो .

9️⃣ Farmer ID शिवाय योजना मिळू शकतात का?

👉सरकारने फार्मर आयडी  बंधन कारक केला असल्याने farmar ID शिवाय कोणत्याही योजनेचा लाभ मिळू शकत नाही.


Post a Comment

0 Comments